आयपीएल २०२५ च्या हंगामात रुळावरून घसरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं कोपराच्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. चेन्ई सुपर किंग्जसाठी हा मोठा धक्का असला तरी चाहत्यांना MS धोनी पुन्हा कर्णधार झाल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. त्यातील काही पोस्ट अधिक लक्षवेधी ठरताना दिसत आहेत. एक नजर CSK च्या ताफ्यातील नाट्यमय घडामोडीनंतरसोशल मीडियावर उमटणाऱ्या काही खास कमेंटवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऋतुराजची उणीवर भासणार नाही, कारण...
CSK
ऋतुराज गायकवाड याने स्पर्धेतून माघार घेतल्यावर CSK फ्रँचायझी संघाने घेतलेल्या निर्णयावर अनेक चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत आहे. एका चाहत्याने स्पर्धेतून 'आउट' झालेल्या ऋतुराजवर टीका करताना त्याचे संघासाठी शून्य योगदान होते. त्यामुळे त्याची उणीव भासणार नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर धोनीच्या नेतृत्वाखाली संघ गुणतालिकेत उंच उडी मारेल, अशा विश्वासही CSK च्या या चाहत्याने व्यक्त केला आहे.
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद!
ऋतुराज गायकवाडला खरंच दुखापतग्रस्त आहे का?
CSK
CSK च्या ताफ्यातील नेतृत्व बदलानंतर काही मीम्सही व्हायरल होताना दिसत आहेत. या मीम्समधून ऋतुराज गायकवाड खरंच दुखापतग्रस्त आहे का? असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आल्याचे दिसते. एक्स अकाउंटवर व्हायरल होणाऱ्या मीम्समध्ये एमएस धोनी आणि कोच फ्लेमिंगसह ऋतुराज गायकवाडचा फोटो वापरण्यात आला आहे. ज्यात ऋतुराज गायकवाड हा मी दुखापतग्रस्त नाही माही भाई, असे म्हणताना दाखवण्यात आले आहे.
या कारणामुळे ऋतुराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला?
CSK
एका वापरकर्त्याने दुखापतीच्या नावाखाली ऋतुराज गायकवाडला संघाबाहेर काढत चेन्नई सुपर किंग्जच्या संघानं धोनीला पुन्हा कर्णधार केले आहे, असे मत व्यक्त केल्याचेही दिसून येते. १७५ पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आपल्या बॅटिंगची छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. १३ डावात त्याने १२.४ च्या सरासरीसह फक्त १६१ धावा केल्या आहेत. या आकडेवारीमुळेच ऋतुराज गायकवाडला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा उल्लेखही या पोस्टमध्ये दिसून येतो.
Web Title: IPL 2025 He had only made things worse Fans Erupt As Ruturaj Gaikwad Gets Ruled Out Of IPL 2025 And MS Dhoni Set To Lead CSK Again Viral Post
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.