आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

IPL 2025: आयपीएलमधील संघात एकीकडे प्लेऑफसाठीची शर्यंत रंगली असतानाच दुसरीकडे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणाऱ्या ऑरेंग कॅप आणि सर्वाधिक बळी टिपणाऱ्या गोलंदाजांला मिळणाऱ्या पर्पल कॅपसाठीही खेळाडूंमध्ये चुरस दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:03 IST2025-04-26T15:02:38+5:302025-04-26T15:03:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025: Half of the IPL season is over, the race for the Orange and Purple Caps along with the playoffs has also become colorful, who is in the lead? Read | आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यंदाच्या आयपीएलमध्ये गुणतक्त्यात दरवर्षीपेक्षा थोडं वेगळंच चित्र दिसत आहे. एकीकडे बलाढ्य चेन्नईचा संघ तळाला आहे, तर गतविजेता कोलकाता नाईटरायडर्सचा संघही झुंजत आहे. तर दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ दबदबा राखून आहेत. आयपीएलमधील संघात एकीकडे प्लेऑफसाठीची शर्यंत रंगली असतानाच दुसरीकडे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणाऱ्या ऑरेंग कॅप आणि सर्वाधिक बळी टिपणाऱ्या गोलंदाजांला मिळणाऱ्या पर्पल कॅपसाठीही खेळाडूंमध्ये चुरस दिसून येत आहे.

आयपीएलमध्ये शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यानंतर पर्पक कॅपच्या क्रमावारीत काही बदल झाले. यात हैदराबादचा हर्षल पटेल आणि चेन्नईचा नूर अहमद यांचं पहिल्या ५ गोलंदाजांमध्ये पुनरागमन झालं. पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये गुजरात टायटन्सचा प्रसिद्ध कृष्णा आठ सामन्यांत १६ बळींसह आघाडीवर आहे. प्रसिद्ध कृष्णाप्रमाणेच जोश हेझलवूडनेही १६ बळी टिपले आहेत. मात्र सरस इकॉनॉमीमुळे कृष्णा आघाडीवर आहे.

तर चेन्नई सुपरकिंग्सच्या नूर अहमद याने शुक्रवारी दोन बळी टिपले त्याबरोबरच यंदाच्या हंगामात त्याने टिपलेल्या बळींची संख्या १३ वर पोहोचली. त्याबरोबरच त्याने सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसरं स्थान पटकावलं आहे. तर याच सामन्यात चार बळी टिपणाऱ्या हर्षल पटेलने १३ बळींसह चौथं स्थान पटकावलं आहे. याशिवाय पर्पल कॅपच्यायादीमध्ये इतर १२ गोलंदाजांच्या नावार प्रत्येकी १२ बळी आहेत.

याबरोबरच ऑरेंज कॅपसाठीही अटीतटीची लढाई सुरू आहे. यात गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन ४१७ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ३९२ धावा फटकावल्या आहेत. तर सुरुवातीला या क्रमवारी  अव्वल स्थानी असलेला निकोलस पुरन ३७७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागच्या तीन डावांत पुरनची बॅट तळपलेली नाही. मुंबईचा सूर्यकुमार यादव ३७३ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर गुजरातचा जोस बटलर आणि राजस्थानचा यशस्वी जयस्वाल ३६५ धावांसह संयुक्तरीत्या पाचव्या क्रमांकावर आहे.

तर संघांच्या गुणतक्त्यामध्ये गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी १२ गुण असून धावगतीनुसार गुजरात पहिल्या, दिल्ली दुसऱ्या आणि बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्स १० गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय पंजाब किंग्स आणि लखनौ यांचेही प्रत्येकी १० गुण आहेत. मात्र कमी धावगतीमुळे ते अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. कोलकाता नाईटरायडर्स सातव्या, तर सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स नवव्या तर चेन्नई सुपरकिंग्स दहाव्या क्रमांकावर आहे.   

Web Title: IPL 2025: Half of the IPL season is over, the race for the Orange and Purple Caps along with the playoffs has also become colorful, who is in the lead? Read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.