Join us

IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

या जोडीनं दिल्ली कॅपिटल्सला दिलेल्या दमदार रिप्लायसह गुजरात  टायटन्सच्या संघाने नवा इतिहास रचला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 00:27 IST

Open in App

IPL 2025 GT Becomes First Team In IPL History To Chase 200 Or More Runs Without Losing A Wicket : आयपीएल स्पर्धेतील १८ व्या हंगामातील ६० वा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर रंगला होता. घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर लोकेश राहुलच्या ११२ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ बाद १९९ धावा करत गुजरात टायटन्ससमोर २०० धावांचे टार्गेट सेट केले होते. गुजरात टायटन्सनं एकही विकेट न गमावता हा सामना १० विकेट्स आणि ६ चेंडू राखून जिंकला. धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शनच्या भात्यातून नाबाद शतकी खेळी आली. दुसऱ्या बाजूला कर्णधार शुबमन गिलही नाबाद राहिला. या जोडीनं दिल्ली कॅपिटल्सला दिलेल्या दमदार रिप्लायसह गुजरात  टायटन्सच्या संघाने नवा इतिहास रचला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला गुजरात

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक संघांनी २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवलाय. पण एकही विकेट न गमावता २०० ची लढाई अजूनपर्यंत कुणीच जिंकलेली नव्हती. गुजरात टायटन्सची सलामी जोडी जमली अन् जे आतापर्यंत घडलं नव्हतं ते पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन याने ६१ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटाकारांच्या मदतीने नाबाद १०८ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला शुबमन गिल ५३ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ९३ धावांवर नाबाद राहिला.  

IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट

केएल राहुलची शतकी खेळी, पण...

शुबमन गिलने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर लोकेश राहुल आणि फाफ ड्युप्लेसिस जोडीं दिल्लीच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या १६ धावा असताना अर्शद खान याने फाफच्या रुपात दिल्लीच्या संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर  लोकेश राहुलनं अभिषेक पोरेलच्या साथीनं डाव सावरला. केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली.  अभिषेक पोरेल १९ चेंडूत ३० धावा करून माघारी फिरला. मग दिल्लीचा कर्णधार अक्षर पेलनं १६ चेंडूत २५ धावांची उपयुक्त खेळी केली. लोकेश राहलनं ६५ चेंडूत केलेली ११२ धावांची नाबाद खेळी आणि स्टब्सनं १० चेंडूत केलेल्या २१ धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ बाद १९९ धावा केल्या होत्या. या धावा गुजरातच्या सलामी जोडीनं अगदी सहज काढल्या.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५गुजरात टायटन्सदिल्ली कॅपिटल्सशुभमन गिललोकेश राहुल