Shubman Gill Angry on Umpires Viral Video, IPL 2025 GT vs SRH: गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करून सनरायजर्स हैदराबादला २२५ धावांचे आव्हान दिले. कर्णधार शुबमन गिलच्या दमदार ७६ धावांच्या जोरावर गुजरातने द्विशतकी मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना, हैदराबादचा डाव गडबडला. अभिषेक शर्मा एका बाजुने झुंज देत होता, पण त्यालाही आपल्या संघाला पराभवापासून वाचवता आले नाही. त्याचे अर्धशतक झाल्यानंतर मैदानत एक किस्सा घडला. त्यावेळी शुबमन गिल भलताच संतापलेला पाहायला मिळाला.
हैदराबादचा संघ आव्हानाचा पाठलाग करत असताना १३व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जी घटना घडली, त्यामुळे शुबमन गिल प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला. प्रसिध कृष्णाने टाकलेला चेंडू लेग स्टंपच्या रेषेजवळ होता. अभिषेक शर्माने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका हुकला आणि चेंडू पायावर आदळला. LBW चे अपील करण्यात आले. मैदानावरील पंचांनी अभिषेकला नाबाद ठरवले. त्यानंतर गुजरातने DRS घेतला. त्यात चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या रेषेबाहेर पडताना दिसला. त्यामुळे चेंडू स्टंपला लागू शकला असता तरीही चेंडूच्या टप्प्यामुळे अभिषेकला नाबाद ठरवण्यात आले.
घडलेला प्रकार पाहून शुबमन गिल पंचांना विचारण्यासाठी आला. पंचांनी गोष्ट समजावून सांगितली. तरीही गिल पंचांशी वाद घालताना दिसला आणि खूपच रागात दिसला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव सारं काही सांगून जात होते. पण अखेर पंचांनाच निर्णय अंतिम मानावा लागला आणि गिल फिल्डिंग करण्यासाठी आपल्या जागेवर गेला.
----
यानंतर पुढच्याच षटकात अभिषेक शर्मा झेलबाद झाला. त्याने ४१ चेंडूत ७४ धावांची खेळी केली.