IPL 2025 GT vs SRH 51st Match Player to Watch Karim Janat Gujarat Titans टी-२० क्रिकेटमध्ये ११८ विकेट्स अन् दोन शतकासह खात्यात २००० पेक्षा अधिक धावा असणाऱ्या अफगाणिस्तानच्या स्टार ऑलराउंडर करीम जनत याला राजस्थान विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली. २८ वर्षीय स्टार क्रिकेटरसाठी पदार्पणाचा सामना हा भयावह स्वप्नासारखाच ठरला. १४ वर्षांच्या पोरानं त्याच्या पहिल्याच षटकात ३० धावा कुटल्या. मग चर्चा रंगू लागली ती IPL पदार्पणातच त्याच करिअर संपल्याची. खरंतर क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये कुणाचं करिअर घडत नाही अन् ते संपतही नाही. इथं आपण हीच गोष्ट क्रिकेटच्या इतिहासातील रेकॉर्डच्या माध्यमातून समजून घेऊयात.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजाने मार खाल्ला म्हणजे तो संपला असं होत नाही, हा आहे त्याचा पुरावा
गुजरातकडून पदार्पणाच्या सामन्यात करीम जनत याने फक्त एक ओ्व्हर टाकली. ज्यात त्याच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यंवशी याने षटकार चौकारांची बरसात करत ३० धावा कुटल्या. यासह तो पदार्पणाच्या सामन्यात सर्वात महागडे षटक टाकणारा गोलंदाज ठरला. याआधी आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वात महागडे षटक टाकण्याचा खराब रेकॉर्ड वरुण चक्रवर्तीच्या नावे होता. २०१९ च्या हंगामात कोलकाताकडून पदार्पण करताना पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं २५ धावा खर्च केल्या होत्या. पण तोच वरुण चक्रवर्ती मिस्ट्री स्पिनरनं आज क्रिकेट जगतात आपला एक दबदबा निर्माण केलाय.
IPL 2025: ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातील 'डबल आर्म' शस्त्र अन् त्याच्या गोलंदाजीतील शास्त्र
प्रश्न फक्त इतकाच की, संधी लगेच मिळणार की,..
पदार्पणाच्या सामन्यातील धक्क्यातून सावरण्यासाठी वरुण चक्रवर्ती हे करीम जनतसाठी एक उत्तम उदाहरण आहे. एवढेच नाही तर गुजरातच्या ताफ्यातून खेळताना रिंकू सिंहनं ज्याला एका षटकात ५ षटकार मारले होते. तो यश दयालही आज IPL चं मैदान गाजवतोय. अफगाणिस्तानच्या खेळाडूला या भारतीय गोलंदाजांप्रमाणे कमबॅकची संधी नक्कीच मिळेल. फक्त प्रश्न हा की, गुजरातच्या ताफ्यात बेंच स्टेंथही एकदम स्टाँग असल्यामुळे ती संधी त्याला लगेच मिळणार की, त्यासाठी वेळ लागणार ते पाहण्याजोगे असेल.
अफगाणिस्तानच्या स्टारची टी-२० तील कामगिरी
आयपीएलमध्ये पदार्पणात महागडे षटक टाकण्याआधी आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यातही त्याने ६६ धावा खर्च केल्या होत्या. जानेवारी २०२४ मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी त्याच्या एका षटकात ३६ धावा कुटल्या होत्या. या सान्यात त्याने २ षटकात ६६ धावा खर्च केल्या होत्या. पण करीम जनतला त्याच्या आतापर्यंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर IPL चे दरवाजे खुले झाले. त्याने आतापर्यंतच्या टी-२० कारकिर्दीत १६० सामन्यात २४९४ धावा केल्या आहेत. यात दोन शतकासह ९ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याच्या खात्यात ११८ विकेट्स आहेत. गुजरात टायटन्सच्या संघाने याच कामगिरीच्या जोरावर या गड्यावर ७५ लाख रुपयांचा डाव खेळला आहे,
Web Title: IPL 2025 GT vs SRH 51st Match Lokmat Player to Watch Karim Janat Gujarat Titans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.