IPL 2025 GT vs SRH 51st Match Player to Watch Kamindu Mendis Sunrisers Hyderabad : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात स्पर्धेतील ५१ वा सामना रंगणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात ३ सामने जिंकून आपल्या खात्यात ६ गुण जमा केले आहेत. स्वबळावर प्लेऑफ्सचा १६ मॅजिक आकडा गाठण्यासाठी संघाला उर्वरित सर्वच्या सर्व ५ सामने जिंकावे लागतील. आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी घाई गडबड टाळून जबाबदारीनं खेळण्यासोबत संघातील अष्टपैलू कामिंदु मेंडिस याच्यावरही नजरा असतील. श्रीलंकन खेळाडू गोलंदाजीसह फलंदाजीतही धमक दाखवण्याची क्षमता बाळगतो. इथं एक नजर टाकुयात दोन्ही हातांनी गोलंदाजी करत लक्षवेधी ठरलेल्या कामिंदु मेंडिसबद्दल....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कामिंदु मेंडिस म्हणजे 'डबल आर्म शस्त्र', इथं समजून घ्या त्याच्या गोलंदाजीतील 'शास्त्र'
कांमिदु मेंडिस हा डाव्या आणि उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. डावखुऱ्या फलंदाजाला तो उजव्या हाताने गोलंदाजी करत (Right-Arm Offbreak) चेंडू बाहेर काढताना दिसते. याउलट उजव्या हाताच्या फलंदाजासमोर तो डाव्या हाताने गोलंदाजी (Left-arm orthodox spin) करत चेंडू बाहेर काढण्यात माहिर आहे. SRH च्या ताफ्यातून खेळताना त्याने दोन विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने उजव्या हाताचा बॅटर रघवंशीला आपल्या जाळ्यात अडकवले. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजाला त्याने चकवा दिला. या दोन विकेट्स श्रीलंकन गोलंदाजामधील दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याची प्रभावी क्षमता दाखवून देणाऱ्या आहेत.
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
छोट्या पण उपयुक्त खेळीसह बॅटिंगमध्येही दाखवलीये धमक
दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा कमिंदू मेंडिस हा डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतो. SRH कडून तीन सामन्यातील दोन सामन्यात त्याच्या बॅटिंगमधील तेवरही पाहायला मिळाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने २० चेंडूत २७ धावा केल्या होत्या. गुजरात विरुद्ध तो अवघ्या एका धावेवर बाद झाला. पण चेन्नई विरुद्धच्या सामन्यात २२ चेंडूत ३२ धावांची खेळी करत त्याने आपल्या बॅटिंगमधीलही धमक दाखवलीये. याशिवाय आयपीएलमधील सर्वोत्तम कॅच घेत देखील त्याने आपल्या फिल्डिंगचा सर्वोत्तम नजराणाही पेश केलाय. कसोटीत १३ डावात १००० धावा करत त्याने सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. हा रेकॉर्ड तो बॅटिंगमध्येही भरवशाचा खेळाडू असल्याचे सिद्ध करणारा आहे.
SRH च्या संघाकडून त्याला किती रुपये मिळाले?
श्रीलंकेकडून १२ कसोटी सामन्यासह १९ वनडे आणि २३ टी२० सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या कामिंदु मेंडिसला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ७५ लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. आगामी सामन्यातही संघ व्यवस्थापन त्याच्यावर भरवसा दाखवेल, अशी अपेक्षा आहे.