Riyan Parag Arguing With Umpire After Given Out : अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २३ व्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल अवघ्या ६ धावा करून परतल्यावर त्याची जागा घेण्यासाठी आलेला नितीश राणा अवघी एका धावेची भर घालून तंबूत परतला. २ बाद १२ धावा असताना रियान परागनं संजू सॅमसनच्या साथीनं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या भात्यातून १ चौकार आणि ३ षटकारही पाहायला मिळाले. ही जोडी जमलीये असं वाटत असताना आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या कुलवंत खेजरोलिया याने त्याचा खेळ खल्लास केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रियान आउट की नॉटआउट?
सातव्या षटकात रियान परागच्या रुपात राजस्थानच्या संघाला तिसरा धक्का बसला. या षटकातील चौथ्या चेंडूवर रियान परागला पंचांनी यष्टीमागे झेलबाद ठरवले. रियान अंपायरच्या निर्णायवर नाखुश दिसला. चेंडू बॅटची कड घेऊन गेलेला नाही, असे त्याचे म्हणने होते. राजस्थाननं रियानची विकेट वाचवण्यासाठी रिव्हूव्ह ही घेतला पण शेवटी हा निर्णय़ गुजरातच्या बाजूनेच लागला. रियान परागची खेळी १४ चेंडूत २६ धावांवर थांबली.
IPL Record: साईच्या भात्यातून 'फिफ्टी'चा विक्रमी 'पंच'; पठ्ठ्या थेट एबीच्या पंक्तीत जाऊन बसला
मैदानातील पंचाशी हुज्जत घालताना दिसला रियान पराग
तिसऱ्या पंचाचा निर्णय आल्यावरही रियान पराग मैदानातील पंचाशी हुज्जत घालताना दिसले. यावेळी पंचांनी त्याला प्लीज गो...असं काहीसे म्हटल्याचेही पाहायला मिळाले. नाराजी व्यक्त करण्यासाठी तो पंचाकडे रागाने पाहताना दिसला. तिसऱ्या पंचांनी आउट दिल्यावर त्याने मैदानातील अंपायरसमोर हुज्जत घातल्यामुळे तो अडचणीत येणार का? ते पाहण्याजोगे असेल.
नेमकं काय घडलं?
रियान परागला ज्या चेंडूवर आउट देण्यात आले त्यावेळी हा चेंडू खेळताना त्याची बॅट ग्राउंडला स्पर्श झाली होती. पण रिप्ले पाहिल्यावर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाल्याचेही स्निकोत दिसून आले. त्यामुळेच त्याला आउट देण्यात आले. पण राजस्थानचा बॅटर यावर नाखुशच दिसला.
Web Title: IPL 2025 GT vs RR 23rd Match Riyan Parag Arguing With Umpire After Given Out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.