IPL 2025 : धु धु धुतल्यावर तो खडबडून जागा झालाय! आता दाखवतोय फलंदाजांची झोप उडवण्याची 'ताकद'

पहिल्याच सामन्यात त्याला धु धु धतलं. त्याने जेवढ्या वेगानं चेंडू टाकला तेवढ्याच वेगानं तो सीमारेषेबाहेर गेला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:37 IST2025-04-09T11:27:43+5:302025-04-09T11:37:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 GT vs RR 23rd Match Lokmat Player to Watch Jofra Archer Rajasthan Royals | IPL 2025 : धु धु धुतल्यावर तो खडबडून जागा झालाय! आता दाखवतोय फलंदाजांची झोप उडवण्याची 'ताकद'

IPL 2025 : धु धु धुतल्यावर तो खडबडून जागा झालाय! आता दाखवतोय फलंदाजांची झोप उडवण्याची 'ताकद'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 GT vs RR 23rd Match Player to Watch Jofra Archer Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या वेगाचा सामना करणं कोणत्याही फलंदाजासाठी एक मोठं आव्हानच असते. पण आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याची खूपच खराब झाली. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी पहिल्याच सामन्यात त्याला धु धु धतलं. त्याने जेवढ्या वेगानं चेंडू टाकला तेवढ्याच वेगानं SRH च्या स्फोटक फलंदाजांनी तो सीमाबाहेर मारला. अन् लाजिरवाणा विक्रम जोफ्राच्या नावे झाला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आर्चर

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आपल्या ४ षटकांच्या कोट्यात जोफ्रा आर्चरला विकेट तर मिळाली नाहीच. पण या सामन्यात त्याने ७६ धावा खर्च केल्या. हा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकण्याचा लाजिरवणारा रेकॉर्ड आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने एक ही विकेट न घेता १५ चेंडूत ३३ धावा खर्च केल्या.

PBKS vs RR : आधी ड्रेसिंग रुममध्ये झोप काढली; मग जोफ्रानं पहिल्याच ओव्हरमध्ये दोघांना केलं 'बोल्ड'
 
यंदाच्या हंगामातील पहिले निर्धाव षटक टाकत जबरदस्त कमबॅक

साडे बारा कोटींचा डाव लावलेला हा जलदगती गोलंदाज लाखांचे बारा हजार करत राजस्थान रॉयल्सचं दिवाळ काढणार, असेच चित्र पहिल्या दोन सामन्यानंतर निर्माण झाले होते. पण तिसऱ्या सामन्यात हा गडी तापला. आपल्या भेदक माऱ्यासह त्यानं जबरदस्त कमबॅक केले. इतिहासात सर्वात महागडे स्पेल टाकणाऱ्या जोफ्रानं यंदाच्या हंगामातील पहिले निर्धाव षटक टाकले. त्यात विकेटही मिळाली अन् तो ट्रॅकवर आला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने ३ षटकात फक्त १३ धावा खर्च करत एक विकेट आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले.

खडबडून जागे झाल्यावर फलंदाजांची झोप उडवण्याचा 'सिलसिला'

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात तो वेगळ्याच कारणास्तव चर्चेत आला. एका बाजूला संघाची बॅटिंग सुरु असताना दुसऱ्या बाजूला ड्रेसिंग रुममध्ये तो ब्लँकेट घेऊन निवांत झोप काढताना स्पॉट झाले. प्लेइंग इलेव्हनचा भाग असताना त्यानं केलेली ही कृती सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडणारी होती. कारण हे तो मॅच नसल्याचे लक्षणं होते. कारण बॅटिंग असो वा बॉलिंग मैदान मारायचं असेल तर प्रत्येक खेळाडूची देहबोली सकारात्मक असावी लागते. ज्याला काहीच पडलेली नाही तो बाबा गोलंदाजीवेळी काय कामी येणार असा प्रश्नही काहींना पडला असेल. पण जोफ्राने पहिल्याच षटकात याचे उत्तर दिले. झोपलो होतो पण आता फलंदाजांची झोप उडवायला तयार आहे, या तोऱ्यात त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. या सामन्यात त्याने २५ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. आता कामगिरीतील सातत्य कायम राखत तो हा 'सिलसिला कायम ठेवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

जोफ्राची IPL मधील कामगिरी

जोफ्रा आर्चर याने २०१८ मध्ये राजस्थानच्या संघाकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केलेहोते. मुंबई इंडियन्स विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना ३ विकेट घेत तो सामनावीरही ठरला होता. पदार्पणाच्या हंगामात त्याने १५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. २०२० च्या हंगामात त्याने सर्वाधिक २० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.  राजस्थानशिवाय तो मुंबई इंडियन्स संघाचाही भाग राहिला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या यंदाच्या हंगामातील २३ व्या सामन्याआधी जोफ्राच्या खात्यात ४४ सामन्यात ५२ विकेट्स जमा आहेत.
 

Web Title: IPL 2025 GT vs RR 23rd Match Lokmat Player to Watch Jofra Archer Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.