Join us

IPL 2025 : आता प्रत्येक लढत 'करो या मरो'ची! LSG च्या ताफ्यातील या तिघांवर असेल मोठी जबाबदारी

इथं एक नजर टाकुयात त्या तीन स्टार खेळाडूंवर ज्यांच्याकडून LSG ला असेल सर्वोत्तम कामगिरीची आस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:50 IST

Open in App

IPL 2025 LSG vs SRH 61st Match Player to Watch Mitchell Marsh Aiden Markram Nicholas Pooran Lucknow Super Giants : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रिषभ पंतनं  LSG संघ मालकाला चुना लावलाय. तो फलंदाजीसह नेतृत्वात छाप सोडण्यात कमी पडल्याचे दिसून येते. ११ सामन्यातील फक्त ५ विजयासह संघाच्या खात्यात १० गुण जमा आहेत. या ढिसाळ कामगिरीनंतरही ते अजूनही प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून आहेत. आता प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारण्यासाठी आधी त्यांना उर्वरित सर्वच्या सर्व ३ सामने जिंकावे लागतील. याशिवाय मुंबई इंडियन्स अन् दिल्ली कॅपिटल्स यांच्या निकालावर त्यांचे गणित जुळणार की, नाही ते अवलंबून असेल. संघाला १६ गुणांपर्यंत पोहचण्याची प्रमुख जबाबदारी ही तीन फॉरेनर खेळाडूंवर असेल. इथं एक नजर टाकुयात त्या तीन स्टार खेळाडूंवर ज्यांच्याकडून LSG ला असेल सर्वोत्तम कामगिरीची आस 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मिचेल मार्शनं चार अर्धशतकासह सोडलीये खास छाप, आता... 

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर फक्त बॅटरच्या जोरावर संघासोबत आहे. दुखापतीमुळे त्याने बॉलिंग केली नसली तरी बॅटिंगमध्ये त्याने संघाला दमदार सुरुवात करून दिल्याचे पाहायला मिळाले आहे. १० सामन्यात त्याच्या भात्यातून ४ अर्धशतके आली आहेत. यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघासमोर त्याने अनुक्रमे ७२ (३६) आणि ५२ (३१) अशी दिमाखदार कामगिरी केली होती. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता विरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्स विरुद्धची ३१ चेंडूतील ६० धावांची खेळी करणाऱ्या मिचेलनं कोलकाता विरुद्ध ४८ चेंडूत ८१ धावांसह यंदाच्या हंगामातील सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. हाच तोरा तो उर्वरित ३ सामन्यात दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?

मार्करमला हैदराबाद विरुद्धची कसर भरून काढण्यात यश मिळणार का?

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर एडन मार्करम हा देखील संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. त्यानेही यंदाच्या हंगामात ४ अर्धशतकासह त्याने ११ सामन्यात ३४८ धावा केल्या आहेत. लखनौ संघाच्या ताफ्यात सामील होण्याआधी तो हैदराबादच्या ताफ्यातूनही खेळताना दिसला आहे. त्याच्याकडून हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. साखळी फेरीतील या आधीच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध तो अवघ्या एका धावेवर बाद झाला होता.  

निक्कीनं धुमाकूळ घातलेला, पण आता....

निकोलस पूरन याने यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ११ सामन्यात ४ अर्धशतकासह त्याने ४१ च्या सरासरीसह २०० च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या आहेत. आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील नाबाद ८७ ही सर्वोच्च धावसंख्या त्याने यंदाच्या हंगामातच केलीये.  पण मागील पाच सामन्यात त्याने तलवार म्यान केल्याचे दिसते. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध तो फक्त ९ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ८ चेंडूत ११ धावा, दिल्ली कॅपिटल्स  विरुद्ध ५ चेंडूत ९ धावा आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध १५ चेंडूत २७ धावांच्या खेळीशिवाय पंजाब किंग्जविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात त्याने ५ चेंडूत फक्त ६ धावा केल्याचे पाहायला मिळाले. त्याचा फॉर्म गायब झाल्याचा मोठा फटका LSG ला बसला आहे. प्रत्येक लढत महत्त्वाची असताना त्याच्या भात्यातून तुफान फटकेबाजीची संघाला अपेक्षा असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्ससनरायझर्स हैदराबादइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट