Join us

IPL मधील सर्वात स्लो बॉल; वाट बघून चौकार मारल्यावर बटलरला आलं हसू (VIDEO)

या चेंडूवर बटलरनं मारलेला अतरंगी फटकाही चर्चेचा विषय ठरतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 21:52 IST

Open in App

आयपीएलच्या सामन्यावेळी सर्वात वेगवान चेंडू फेकण्याच्या रेकॉर्डसंदर्भात बऱ्याचदा ऐकले असेल. पण गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील युवा गोलंदाजानं आयपीएलमधील सर्वात हळू चेंडू टाकल्याचे पाहायला मिळाले.  या चेंडूवर बटलरनं मारलेला अतरंगी फटकाही चर्चेचा विषय ठरतोय. टॉस गमावल्यावर गुजरात टायटन्सच्या संघाकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. पण शुबमन गिल अर्धशतकापासून चुकला. हार्दिक पांड्याने त्याला ३८ धावांवर माघारी धाडले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!आयपीएलमधील सर्वोत स्लो चेंडू, त्यावर बटलरनं अतरंगी अंदाजात मारला फटका 

शुबमन गिलची विकेट गमावल्यावर इंग्लंडचा स्टार बॅटर जोस बटलर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने २४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारच्या मदतीने ३९ धावांची खेळी केली. त्याच्या या छोट्याखानी खेळीतील एक चौकार चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. १३ व्या षटकात सत्यनारायण राजू गोलंदाजीसाठी आला. साई सुदर्शननं त्याच्या पहिल्या चेंडूवर एक धाव काढून स्ट्राइक बटलरला दिले. त्यानंतर दुसऱ्या राजूनं इंग्लंडच्या धडाकेबाज फलंदाजाविरुद्ध स्लोवर बाउन्सर ट्राय केला. त्याने टाकलेला हा चेंडू टेनिस बॉल क्रिकेटमधील आखूड टप्प्याचा चेंड़ू जसा टाकला जातो अगदी तसाच होता. बटलरन या चेंडूवर वाट बघून अतरंगी फटका खेळला. ज्याच्यावर त्याचा चौकारही मिळाला. हा फटका मारल्यावर बटलरला हसू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

IPL 2025 GT vs MI : रोहितनं सेट केली फिल्डिंग अन् हार्दिक पांड्याला मिळाली गिलची विकेट; चर्चा तर होणारच!

कोण आहे सत्यनारायण राजू?

मुंबईच्या ताफ्यातील नवा चेहरा असलेला सत्यनारायण राजू हा आंध्रप्रदेशचा खेळाडू आहे. मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला ३० लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. राजूने २०२४ मध्ये आंध्र प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली होती. या स्पर्धेत त्याने ७ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या. स्लोवर बॉल ही त्याची खासियत आहे. तोच चेंडू ट्राय करताना त्याने आयपीएलमधील सर्वात स्लो चेंडू टाकला.  

चेन्नई विरुद्ध पदार्पण, गुजरातविरुद्धच्या सामन्यात मिळाली पहिली विकेट

यंदाच्या आयपीएल हंगामातील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यातूनच त्याला पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याने एका षटकात १३ धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याच्यावर संघानं विश्वास कायम ठेवला. दुसऱ्या सामन्यात  ३ षटकात ४० धावा खर्च करत तो महागडा ठरला. पण राशीद खानच्या रुपात गुजरात टायटन्सच्या डावातील अखेरच्या षटकात आयपीएलमधील पहिली विकेट मिळाली.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५जोस बटलरमुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स