Siraj Celebrate Cristiano Ronaldo's Vintage Calma Style After Dismissing Rohit Sharma गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून मैदानात उतरलेल्या मोहम्मद सिराजनंमुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकातच रोहित शर्माचा त्रिफळा उडवत तंबूचा रस्ता दाखवला. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मानं पहिला चेंडू निर्धाव खेळल्यावर मोहम्मद सिराजच्या पुढच्या दोन चेंडूवर दोन खणखणीत चौकार मारले. पण त्यानंतर सिराजनं जबरदस्त कमबॅक करत ऑफ स्टंप बाहेर टाकलेला चेंडू स्विंग करत रोहितला चकवा दिला. त्याने टाकलेल्या अप्रतिम चेंडूसमोर रोहित हतबल ठरला अन् त्याचा त्रिफळा उडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितला बोल्ड केल्यावर सिराजनं केलं रोनाल्डो स्टाइल सेलिब्रेशन रोहित शर्माची विकेट घेतल्यावर मोहम्मद सिराजनं फुटबॉलच्या मैदानातील स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या अंदाजात विकेट्सचा आनंद व्यक्त केला. या सेलिब्रेशनमध्ये बरंच काही दडलं होते. सलग दोन खणखणीत चौकार मारल्याचा राग तर त्यात असावाच. पण रोहितच्या नेतृत्वाखालील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाच्या ताफ्यात स्थान न मिळाल्याचा रागही त्या शांत सेलिब्रेशनमध्ये दडलेला होता, असेच काहीसे दिसून आले. गुजरातचा कॅप्टन शुबमन गिलनंही त्याची पार्टी जॉइन केल्याचे पाहायला मिळाले.
IPL मधील सर्वात स्लो बॉल; वाट बघून चौकार मारल्यावर बटलरला आलं हसू (VIDEO)
पॉवर प्लेमध्ये सिराजची हवा, दोन्ही सलामीवीरांना दाखवला तंबूचा रस्ता
मोहम्मद सिराज फक्त रोहित शर्माची विकेट घेऊन थांबला नाही. त्याने मुंबई इंडियन्सचा दुसरा सलामीवीर रायन रिकल्टन यालाही आउट केले. मुंबई इंडियन्सच्या धावफलकावर ३५ धावा असताना पॉवरप्लेमधील पाचव्या षटकात सिराजने त्याचाही त्रिफळा उडवला. त्याने ९ चेंडूत ६ धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये सिराजनं दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवत गुजरातच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली.