IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी

मिचेलनं मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 22:20 IST2025-05-22T22:19:31+5:302025-05-22T22:20:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 GT vs LSG You Know Record Shaun And Mitchell Marsh First Pair Of Siblings To Score IPL Hundred | IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी

IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 GT vs LSG  Shaun And Mitchell Marsh First Pair Of Siblings To Score IPL Hundred  : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातील सलामीवीर मिचेल मार्श (Mitchell Marsh ) याने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली. तो यंदाच्या हंगामात शतक झळकवणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. एवढेच नाही तर त्याच्या शतकी खेळीसह आयपीएलच्या इतिहासात नवा अध्यायही जोडला गेलाय. कारण पहिल्यांदाच जगातील लोकप्रिय स्पर्धेत थोरल्या भावानंतर धाकट्या भावाच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले आहे. जाणून घेऊयात मिचेल मार्शचे शतकासह सेट झालेल्या खास रेकॉर्डसंदर्भातील खास गोष्ट

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बॉलिंगपासून दूर राहिला, पण बॅटिंगमध्ये पैसा वसूल शो दाखवला

लखनौचा संघ यंदाच्या हंगामातून आधीच बाद झाला आहे. पण या संघाकडून मिचेल मार्शनं सर्वोत्तम कामगिरी केली. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ६४ चेंडूत १० चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू आहे. पण दुखापतीतून सावरून आयपीएलमध्ये सामील झाल्यामुळे त्याने बॉलिंगपासून दूरावा ठेवत फक्त बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.  या शतकी खेळीसह लखनौच्या ताफ्यातून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.  ११ सामन्यातील ११ डावात त्याने ५६० धावा केल्या आहेत. या यादीत लोकेश राहुल ६१६ धावांसह अव्वलस्थानावर आहे. अखेरच्या सामन्यात त्याला टॉप होण्याची संधी आहे. यासाठी त्याला ५७ धावांची खेळी करावी लागेल.

IPL 2025 : बाप रे! बॉलिंग करायला पळत आला अन् पाय घसरला! एकदा सोडून दोनदा तेच घडलं

मिचेलनं मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत रचला इतिहास

आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजे २००८ मध्ये मिचेल मार्शचा मोठा भाऊ शॉन मार्श हा किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्याचा पंजाब किंग्ज) संघाकडून खेळताना दिसला होता. या हंगामात त्याने एक शतक आणि ५ अर्धशतकासह हंगाम गाजवला होता. २०२५ च्या हंगामात मिचेल मार्शनं एक शतक आणि ५ अर्धशतकाच्या मदतीने आपली छाप सोडलीये. थोरल्यानंतर धाकट्या भावाने आयपीएलमध्ये शतक झळकवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
 

Web Title: IPL 2025 GT vs LSG You Know Record Shaun And Mitchell Marsh First Pair Of Siblings To Score IPL Hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.