आयपीएल २०२५ स्पर्धेतील गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील ६२ वा सामना गुजरात येथील अहदमदाबादच्या मैदानात रंगला आहे. लखनौचा संघ स्पर्धेतून बाद झाला आहे. मात्र हा सामना जिंकून प्लेऑफ्समधील चार संघात अव्वल राहण्याच्या दृष्टीने गुजरातसाठी हा सामना महत्वाचा आहे. शुबमन गिल याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या डावातील दुसऱ्या षटकात गोलंदाजी करताना अर्शद खान बॉलिंग करताना पाय घसरून पडल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय घडलं?
शुबमन गिल सातत्याने डावखुऱ्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या अर्शद खानवर भरवसा दाखवताना पाहायला मिळाले आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यातही दुसऱ्याच षटकात गिलनं त्याच्या हाती चेंडू सोपवला. पहिला चेंडू टाकण्यासाठी रनअप घेतल्यावर क्रिजमध्ये उडी मारून बॉल टाकताना त्याचा पाय घसरला अन् तो जोरात आपटला. नॉन स्ट्राइकवर असलेला मिचेल मार्शही मग लगेच त्याच्या दिशेने धावला. सुदैवाने यावेळी त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. मैदानात फिजियो आल्यावर तो पुन्हा गोलंदाजीसाठी तयार झाला. पण याच षटकात पाचव्या चेंडूवर पुन्हा तो याच पद्धतीने पुन्हा पाय घसरून पडला. या षटकात त्याने १३ धावा खर्च केल्या.
IND vs ENG : BCCI या दिवशी करणार भारतीय कसोटी संघासह नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा
षटक संपवून सोडलं मैदान, दुखापत गंभीर नसावी ही अपेक्षा
त्याने षटक पूर्ण केले असले तरी तो पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करताना दिसला नाही. आपले पहिले षटक संपवल्यावर तो मैदान सोडून बाहेर गेला. पण दुसऱ्या स्पेलसाठी तो पुन्हा मैदानात आल्यामुळे त्याची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. २७ वर्षीय मध्यम जलदगती गोलंदाजाने ७ सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेतल्या आहेत. मोक्याच्या क्षण विकेट घेऊन त्याने आपली छाप सोडली आहे.
Web Title: IPL 2025 GT vs LSG Arshad Khan Slips Twice In Follow Through Survives Major Injury Scare
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.