Join us

IPL 2025 : टी-२० त नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड! LSG च्या ताफ्यातून हा पठ्ठ्या ठरला पंतपेक्षा भारी

मिचेल मार्श, मार्करम आणि निकोलस पूरन या तिघांशिवाय अनकॅप्ड आयुष बडोनी याने लखनौच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी केली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:47 IST

Open in App

IPL 2025 GT vs LSG 64th Match Lokmat Player to Watch Ayush Badoni Lucknow Super Giant : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्स संघाचा प्रवास हा प्लेऑफ्सआधीच थांबला. LSG नं ज्या गड्यावर पाण्यासारखा पैसा ओतला त्या रिषभ पंतनं संघ मालकाला चुना लावला. त्याच्या बॅक टू बॅक फ्लॉप शोमुळे सर्वात महागडी शॉपिंग निर्थक ठरली. मिचेल मार्श, मार्करम आणि निकोलस पूरन या तिघांशिवाय अनकॅप्ड आयुष बडोनी याने लखनौच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी केली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टी-२० त एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड

टी-२० मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नावे असलेल्या या उजव्या हाताच्या युवा भारतीय फलंदाजासाठी  लखनौच्या संघाने ४ कोटी एवढी रक्कम मोजली होती. त्याची किंमत पंतला मिळालेल्या २७ कोटींच्या तुलनेत सहा पटीने कमी होती. पण मोठ्या हिंमतीसह त्याने कॅप्टनला लाजवणारी कामगिरी करून दाखवलीये.  पंतनं १२ सामन्यात १०० च्या स्ट्राइक रेटसह फक्त १३५ धावा केल्यात. एक नजर लखनौच्या ताफ्यातून पंतपेक्षा भारी खेळलेल्या अनकॅप्ड आयुष बडोनीच्या कामगिरीवर

प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण...

गेलसह साहिल चव्हाणचा विक्रम काढला होता मोडित

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून मैदानात उतरणाऱ्या बडोनीनं गतवर्षी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये धमाकेदार खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला होता. १६५ धावांच्या खेळीत त्याने १९ षटकार मारले होते. टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याऱ्या ख्रिस गेलचा विक्रम त्याने मोडीत काढला होता. गेलसह एस्टोनियाच्या साहिल चव्हाण याने एका डावात १८ षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे.   

आयपीएलमधील त्याची कामगिरी

आयुष बडोनी याने यंदाच्या हंगामातील १२ सामन्यातील ११ डावात ३२९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या भात्यातून २ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. ७४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिलीये. २०२२ च्या हंगामापासून आयुष बडोनी लखनौच्या ताफ्यातून खेळताना दिसते. पहिल्या ३ हंगामात अवघ्या २० लाखात खेळणाऱ्या बडोनीला संघाने यंदाच्या हंगामात 'करोडपती' केल्यावर त्याने संघाच विश्वास सार्थ ठरवलाय. आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत ५४ सामन्यात त्याने २ विकेट्स सह ९६३ धावा केल्या असून उर्वरित दोन सामन्यात कामगिरीतील सातत्य कायम ठेवून आयपीएलमध्ये १००० धावांचा पल्ला गाठण्याची संधी त्याच्याकडे आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्सरिषभ पंतइंडियन प्रीमिअर लीगगुजरात टायटन्सटी-20 क्रिकेट