MS Dhoni On IPL Retirement : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगललेल्या सामन्यात दिमाखदार विजयासह यंदाच्या हंगामाची सांगता विजयासह केली. चेन्नईचा प्रवास संपल्यावर धोनीचा पुढचा प्लॅन काय? हा प्रश्न त्याला विचारला जाणार नाही असं कसं होईल. मॅच संपल्यावर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनवेळी धोनीला हा बाउन्सर आलाच. पण धोनीनं यावेळी पुन्हा एकदा लाँग प्लॅनचा विचार न करता पुढच्या काही दिवसांपुरताच विचार करतो असं सांगत निवृत्तीसंदर्भातील विषयावर स्पष्ट बोलणं टाळल्याचे दिसून आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय म्हणाला धोनी?
निवृत्तीसंदर्भात रंगणाऱ्या चर्चेसंदर्भात धोनी म्हणाला आहे की, त्याबद्दल विचार करण्यासाठी अजून खूप वेळ आहे. आता रांचीला जाऊन बाईक राईडचा आनंद घ्यायचा आहे. परत येईन किंवा परतणार नाही, असं हे आता सांगता येणार नाही. याशिवाय त्याने आणखी एका मुद्यावर जोर दिल्याचे दिसून आले. जर क्रिकेटर्संनी कामगिरीच्या अनुषंगाने निवृत्तीचा निर्णय घेतला तर अनेकांना २२ व्या वर्षींच थांबावे लागेल, असेही तो म्हणाला. घरची ओढ आणि बाईक राईडिंगवरील प्रेम दाखवून देताना त्याने आयपीएलच्या पुढच्या हंगामात पुन्हा मैदानात उतरणार का? या विषयावर थेट बोलणं त्यानं अगदी शिताफीने टाळले.
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
धोनी मैदानात उतरला की, तो थांबणार कधी हा प्रश्न पडतोच, मग...
गेल्या काही वर्षांपासून धोनी आयपीएलच्या मैदानात उतरल्यापासून ते हंगाम संपेपर्यंत धोनीच्या निवृत्तीचा मुद्दा गाजताना दिसून आला आहे. सुरुवातीच्या काळात धोनीनं "डेफिनेटली नॉट" म्हणत पुन्हा येईन, या तोऱ्यात हंगाम संपवला. पण यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच त्याने निवृत्तीसंदर्भातील निर्णय हा माझा नाही तर माझं शरीर मला कशी साथ देईल, यावर अवलंबून असेल, ही गोष्ट अगदी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. त्यानंतरही त्याला पुन्हा पुन्हा या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न होतो. तो पुन्हा झाला अन् मग धोनीनं आपला पुढचा सामान्य प्लॅन सांगत विषय संपवला.