IPL 2025 GT vs CSK 67th Match Player to Watch Shahrukh Khan Gujarat Titans : गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ६७ वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. याआधीच्या सामन्यात लखनौच्या संघाने पराभवाचा धक्का दिल्यामुळे गुजरात संघाची प्लेऑफ्समधील नंबर वन टीम होण्याची प्रतिक्षा लांबलीये. गुणतालिकेत तळाला असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघा विरुद्ध पुन्हा ही चूक झाली तर GT च्या संघाला ते महागात पडू शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शाहरुखची कडक फिफ्टी
लखनौ विरुद्धच्या सामन्यात कर्णधार शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर हे भरवशाचे गडी स्वस्तात तंबूत परतल्यावर शाहरुख खान याने कडक फिफ्टी मारली. आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. पण ही खेळी संघासाठी उपयुक्त ठरली नाही. कमालीचा योगायोग हा की, शाहरुख खानचे आयपीएलमधील पहिले अर्धशतकही व्यर्थच ठरले होते. हा मोहरा उर्वरित सामन्यात संघासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. एक नजर त्याच्या कामगिरीवर...
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
३ हंगामात प्रीतीनं भरवसा ठेवला, पण पहिली फिफ्टी आली ती GT कडून खेळताना
शाहरुख खान याने २०२१ च्या हंगामात प्रीती झिंटाच्या मालकीच्या पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये एन्ट्री मारली. तो तीन हंगामात या संघाकडून खेळला पण एकदाही त्याच्या भात्यातून अर्धशतक आले नाही. नाबाद ४१ धावा ही त्याची पंजाब संघाकडून सर्वोच्च खेळी राहिली. गत हंगामात गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळताना त्याने आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक झळकावले. RCB विरुद्धच्या सामन्यात त्याने ३० चेंडूत ५८ धावांची खेळी केली होती. यावेळी लखनौविरुद्ध त्याने २९ चेंडूत ५७ धावा केल्या. दोन्ही वेळी त्याचे अर्धशतक संघासाठी निर्थक ठरले. शाहरुख खान याने पहिल्या आयपीएल अर्धशतकासाठी ३६ वेळा बॅटिंग केली. ५० पेक्षा अधिक ऑलराउंडरने सर्वाधिक डाव घेतल्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावे आहे.
शाहरुखची IPL मधील कामगिरी
पदार्पणाच्या हंगामात शाहरुख खानसाठी पंजाबच्या संघाने ५.२५ कोटी एवढी मोठी रक्कम मोजली होती. या हंगामात ११ सामन्यात त्याने १३४.२१ च्या सरासरीने १५३ धावा केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत त्याने ५३ सामन्यात ७०० धावा केल्या असून यंदाच्या हंगामात १३ सामन्यात त्याने १८८.४६ च्या स्ट्राइक रेटनं १४७ धावा काढल्या आहेत. संघाने प्लेऑफ्स गाठल्यावर त्याला आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी आहे.
Web Title: IPL 2025 GT vs CSK 67th Match Lokmat Player to Watch Shahrukh Khan Gujarat Titans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.