IPL 2025 : MS धोनी येईल अन् पुन्हा येणार की, नाही हा प्रश्न सोडून जाईल!

महेंद्रसिंह धोनी आगामी हंगामात पुन्हा CSK च्या ताफ्यात दिसणार का? याचा अंदाज लावणे कठीण आहे. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 14:12 IST2025-05-25T14:11:44+5:302025-05-25T14:12:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 GT vs CSK 67th Match Lokmat Player to Watch MS Dhoni Chennai Super Kings | IPL 2025 : MS धोनी येईल अन् पुन्हा येणार की, नाही हा प्रश्न सोडून जाईल!

IPL 2025 : MS धोनी येईल अन् पुन्हा येणार की, नाही हा प्रश्न सोडून जाईल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 GT vs CSK 67th Match Player to Watch MS Dhoni Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्जचा संघ ज्या ज्या वेळी मैदानात उतरतो त्या वेळी महेंद्रसिंह धोनी हा चर्चेत असतो. चेन्नईच्या संघाला ५ वेळा जेतेपद मिळवून देणारा आयपीएलमधील यशस्वी कर्णधार टीम इंडियाचा प्रिन्स अन्  गुजरातचा कॅप्टन शुबमन गिलवर भारी पडणार का? यापेक्षा तो पुढचा हंगाम खेळणार का? ही गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत असेल. मागील काही हंगामापासून धोनी मैदानात उतरतो अन् जाता जाता तो पुन्हा IPL खेळणार की नाही? हा प्रश्न सोडून जातो. या हंगामातही पुन्हा तेच चित्र पाहायला मिळेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

धोनीच्या बॅटिंगमध्ये ती धमक नाही दिसली, पण...

यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनी वयाच्या ४३ व्या वर्षी IPL च्या मैदानात उतरला. यंदाच्या हंगामात धोनीला मैदानात जुने तेवर दाखवता आले नसले तरी काही खास विक्रम तो आपल्या नावे करून गेलाय. अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात CSK च्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात कायम ठेवले होते. ऋतुराज गायकवाड याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यावर धोनी पुन्हा एकदा कॅप्टन झाला. अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात कॅप्टन्सी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. याशिवाय सर्वाधिक वयात संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रमही आता धोनीच्या नावे झाला आहे. ४३ वर्षे २८० दिवस वय असताना IPL मध्ये कॅप्टन्सी करणारा तो कर्णधार आहे.   

IPL 2025 : शाहरुख खानचा हिट शो अन् नकोसा विक्रम

विकेटमागची जादू अन्.. पुन्हा मैदानात उतरण्याची आस

महेंद्रसिंह धोनी आगामी हंगामात पुन्हा CSK च्या ताफ्यात दिसणार का? याचा अंदाज लावणे कठीण आहे. शेवटच्या सामन्यात तो हा प्रश्न तसाच सोडून जाईल. बॅटिंगमध्ये फिनिशिंग तोरा दाखवण्यात तो कमी पडला असला तरी विकेटमागे त्याने जी चपळता दाखवलीये ते पाहता CSK च्या चाहत्यांना तो पुन्हा येईल...ही आस असेल. पण एक गोष्ट नक्की की, तो पुन्हा मैदानात उतरला तरी कॅप्टन्सीच्या रुपात तो दिसणार नाही.  यंदाचा हंगाम खराब गेल्यावर किमान कॅप्टन्सीचा शेवट दिमाखात करून CSK चे गडी यशस्वी कॅप्टनला एक विजयी गिफ्ट देणार का ते पाहण्याजोगे असेल.

सर्वात यशस्वी कॅप्टन, हा रेकॉर्ड मोडणं मुश्किल

महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. २००८ ते २०२५ या कालावधीत २३४ सामन्यात IPL मध्ये नेतृत्व करताना त्याने १३५ सामने जिंकले आहेत. सर्वाधिक सामन्यात नेतृत्व केल्यामुळे सर्वाधिक ९७ पराभवही त्याच्याच नावे आहेत. या यादीत रोहित शर्मा १५८ सामन्यातील ८७ विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यशस्वी कॅप्टन्समधील अंतर पाहता धोनीचा कॅप्टन्सीतील हा विक्रम अनेक वर्षे अबाधित राहिल, असाच आहे.

Web Title: IPL 2025 GT vs CSK 67th Match Lokmat Player to Watch MS Dhoni Chennai Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.