Join us

IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)

सिराज अन् निकोलस पूरन यांच्यात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 23:23 IST

Open in App

Mohammed Siraj vs Nicholas Pooran: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील सामन्यात DSP सिराज याने निकोलस पूरन याच्याशी पंगा घेतल्याचे दृश्य पाहायला मिळाले. पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आल्यावर लखनौच्या आघाडीच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत गुजरातच्या ताफ्यातील गोलंदाजांचे अक्षरश: खांदे पाडले. दरम्यान मिचेल मार्शच्या शतकी खेळीशिवाय या सामन्यात निकोलस पूरन याने नाबाद अर्धशतक झळकावले. तो तोऱ्यात फलंदाजी करत असताना सिराजने त्याच्यासमोर स्लेजिंगचा खेळ खेळला. ज्याला निकोलस पूरनने कडक रिप्लायही दिला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सिराज-पूरन यांच्यात कधी अन् नेमकं काय घडलं?

लखनौच्या डावातील १५ व्या षटकात सिराज गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्या चेंडूवर मिचेल मार्शनं त्याचे चौकारासह स्वागत केले. दुसऱ्या चेंडूवर मार्शनं एकेरी धाव घेत निकोलस पूरनला स्ट्राइक दिले. मग निक्कच्या भात्यातून खणखणीत चौकार आला. एक वाइड चेंडू टाकल्यावर सिराजने पूरनला एक निर्धाव चेंडू टाकला. त्यानंतर सिराज लखनौच्या बॅटरला स्लेजिंग करताना दिसून आले. दुसऱ्या बाजूला पूरन च्युंगम चघळत त्याला स्माइल देताना दिसले. त्यामुळे प्रकरण थोडक्यात मिटलं. पण या षटकातील उर्वरित दोन चेंडूवर पूरनने एक षटकार आणि एक चौकार मारत सिराजचा बदला घेतला.

IPL 2025 : बाप रे! बॉलिंग करायला पळत आला अन् पाय घसरला! एकदा सोडून दोनदा तेच घडलं

निक्कीची कडक बॅटिंग, सिराजचा फ्लॉप शो 

लखनौच्या डावात निकोलस पूरन याने अर्धशतकी खेळीसह महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या भात्यातून २७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने २०७ पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं ५६ धावा आल्या. दुसरीकडे मोहम्मद सिराज आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवायला कमी पडला. त्याने चार षटकात ३७ धावा खर्च केल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मोहम्मद सिराजगुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट