Join us

मॅच दरम्यान 'या' जाहिराती नको; IPL आयोजकांना सरकारनं धाडलं पत्र; जाणून घ्या सविस्तर

सरकारच्या या भूमिकेचा IPL सह BCCI ला बसू शकतो मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:55 IST

Open in App

आयपीएलच्या (IPL 2025) आगामी हंगामाला सुरुवात होण्याआधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयायाकडून IPL आयोजकांना सूचना वजा इशारा देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या ही आपली नैतिक जबाबदारी आहे. याचे भान ठेवून आयपीएल सामन्यावेळी ​सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थ आणि अल्कोहोल या गोष्टींचा प्रचार करणाऱ्या जाहिराती दाखवू नयेत, अशी सूचना आयोजकांना देण्यात आली आहे.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आरोग्य मंत्रालयाकडून IPL अध्यक्षांना पत्र

२२ मार्चपासून यंदाच्या आयपीएल हंगामालाचा सुरुवात होणार आहे.  त्याआधी आरोग्य मंत्रालयाकडून आयपीएलचे अध्यक्ष अरूण धूमल यांना एक धाडण्यात आलं आहे. देशातील अनेक तरून क्रिकेटच्या मैदानातील खेळाडूना आदर्श मानतात. लोकप्रिय लीगमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या  सिगारेट, अल्कोहोल याचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. 

जाहिराती तर नकोच, पण खेळाडू अन् समालोचकांनीही या गोष्टीचं समर्थन करु नये

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) अतुल गोयल यांनी आयपीएल अध्यक्ष अरूण धूमल यांना लहिलेल्या पत्रात म्हटलंय की, सिगारेटच्या जाहिरातीसह तंबाखू आणि अल्कोहल संदर्भातील सर्व जाहिरातींवर  प्रतिबंध घालणाऱ्या नियमांचे आयपीएलनं सक्तीने पालन करावे, स्टेडियममध्ये आणि राष्ट्रीय टेलिव्हिजन प्रसारणा वेळी संबंधित जाहिराती दाखवू नयेच. स्पर्धे दरम्यान सामन्याच्या ठिकाणी  यासारख्या गाष्टीची विक्री  होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.  खेळाडू किंवा समालोचक यांच्याकडूनही  सिगारेट, तंबाखू किंवा अल्कोहोल यासंदर्भात समर्थन अपेक्षित नाही, असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

सरकारच्या या भूमिकेचा IPL सह BCCI ला बसू शकतो मोठा फटका

भारतातच नव्हे आयपीएल स्पर्धा ही जगात भारी ठरलीये. २२ मार्चपासून जवळपास दोन महिने क्रिकेट चाहत्यांना फ्रँचायझी संघातील लढतींचा आनंद घेता येणार आहे. आयपीएलचा मोठा चाहतावर्ग असून या स्पर्धेला टेलिव्हिजनच्या माध्यमातून मोठा प्रतिसादही मिळतो.  त्यामुळे जाहिरातीतून मोठी कमाईही होते. सरकारच्या भूमिकेमुळे बीसीसीआय आणि आयपीएलला कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागू शकतो. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५आरोग्यसरकारबीसीसीआय