IPL 2025 ...अन् आता रंगलीये ऋतुराजने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा

ऋतुराज गायकवाडने सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा रंगू लागली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:45 IST2025-04-11T19:42:50+5:302025-04-11T19:45:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Fans Claim Ruturaj Gaikwad Unfollowed MS Dhoni On Instagram | IPL 2025 ...अन् आता रंगलीये ऋतुराजने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा

IPL 2025 ...अन् आता रंगलीये ऋतुराजने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025  Fans Claim Ruturaj Gaikwad Unfollowed MS Dhoni : आयपीएलच्या १८ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्वाचे ओझे पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर आले आहे. ऋतुराज गायकवाड याने दुखापतीमुळे माघार घेतल्यावर आता धोनी पुन्हा CSK चा कर्णधार झालाय. केकेआर विरुद्धच्या सामन्यातून धोनी पुन्हा आयपीएलमध्ये सीएसके संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

धोनी-ऋतुराज यांच्यात मतभेद? सोशल मीडियावर का रंगतीये ही चर्चा

चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील या घडामोडीनंतर ऋतुराज गायकवाडची प्रतिक्रियाही समोर आली होती. चेन्नईच्या फ्रँचायझी संघाने त्याचा एक खास व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तो दुखापतग्रस्त असल्यामुळे सामन्यांना मुकणार असलो तरी डगआउटमधून संघाला चीअर करेन, असे म्हटले होते. या दरम्यान आता धोनी आणि युवा क्रिकेटर ऋतुराज यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसते. ऋतुराज गायकवाडने सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा रंगू लागली आहे.  

MS Dhoni Record : तो पुन्हा येतोय! IPL च्या इतिहासातील एक नवा चॅप्टर घेऊन....

खरंच ऋतुराज गायकवाडने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केलं?

२०२४ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आले होते. या हंगामातसह यंदाच्या हंगामात आतापर्यंत धोनी युवा क्रिकेटरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे दिसले. आता त्याची जागा पुन्हा धोनीनं घेतल्यावर ऋतुराज खरंच दुखापतग्रस्त झालाय की संघाच्या खराब कामगिरीमुळे दुखापतीचं कारण देत त्याला संघाबाहेर केलंय? असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण झालाय. त्यात आता ऋतुराज गायकवाड इन्स्टाग्रामवर ज्या मंडळींना फॉलो करतो त्यात धोनीच नाव दिसत नसल्यामुळे दोघांच्यात मतभेद असल्याचा दावा करण्यात येतोय. मुद्दा हा की, तो याआधी धोनीला फॉलो करत होता की, नाही यासंदर्भात कोणताही पुरावा नाही. 

ऋतुराजच्या अकाउंटवरील खास फ्रेम अन् धोनीवरील प्रेम

सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार, ऋतुराज गायकवाड धोनीला फॉलो करत नाही, हे खरं आहे. पण त्यामुळे दोघांच्यात मतभेद आहेत, असे म्हणता येणार नाही. ऋतुराज गायकवाडच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अशा काही फ्रेम तुम्हाला दिसली ज्यात धोनीवरील त्याच प्रेम तुम्हाला दिसून येईल. २०२३ च्या हंगामात ट्रॉफी जिंकल्यावर ऋतुराज गायकवाडने आपल्या आयुष्यातील पार्टनरसोबत धोनीसोबतचे काही खास फोटो शेअर केले होते. हे फोटो दोघांच्यातील बॉन्डिंगचा एक पुरावाच आहे. ऋतुराजनं लग्नाआधी आपल्या पार्टनरसोबतचा जो पहिला फोटो शेअर केला होतो तो धोनीसोबतचा होता. त्यानंतर तो उत्कर्षा पवार हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला होता.

Web Title: IPL 2025 Fans Claim Ruturaj Gaikwad Unfollowed MS Dhoni On Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.