IPL 2025 Eliminator Match GT vs MI : चंडीगडच्या मुल्लानपूर येथील स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात यंदाच्या आयपीएल हंगामातील प्लेऑफ्समधील एलिमिनेटरची लढत खेळवण्यात येत आहे. क्वालिफायर २ मध्ये एन्ट्री मारत यंदाच्या हंगामातील जेतेपदाची आस कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने ३ बदलासह मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर
आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा रायन रिकल्टन हा रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळाले होते. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी त्याने MI ची साथ सोडली आहे. त्याच्या जागी जॉनी बेअरस्टोलाला मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली आहे. तीन वर्षांनी तो पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे. रोहित शर्मानेच आपल्या नव्या ओपननिंग पार्टनरला MI कडून पदार्पणाची कॅप दिल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय दीपक चाहरच्या जागी हार्दिक पांड्याने रिचर्ड ग्लीसन (Richard Gleeson) याच्यावर भरवसा दाखवला आहे. राज अंगद बावा याला देखील गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून संधी मिळाली आहे.