Rohit Sharma Becomes First Indian History To Hit 300 Sixes : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील प्लेऑफ्समधील 'करो वा मरो'च्या लढतीत अर्थात एलिमिनेटरच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने हिटमॅन रोहित शर्माचे दोन कॅच सोडले. या संधीच सोनं रोहित शर्मानं आपल्या बॅटिंगमधील क्लास दाखवत आयपीएलमध्ये नवा इतिहासात रचला आहे. जगातील सर्वोत मोठी स्पर्धा असलेल्या टी-२० लीगमध्ये ३०० षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. या यादीत फक्त ख्रिस गेल त्याच्या पुढे आहे. ख्रिस गेलनं आयपीएलमधील १४२ सामन्यांत ३५७ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. त्यापाठोपाठ आता सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याच्यानंतर या यादीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
- ख्रिस गेल - ३५७
- रोहित शर्मा - ३००*
- विराट कोहली - २९१
- एमएस धोनी - २६४
- एबी डिव्हिलियर्स - २५१
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
शतकाची संधी हुकली, पण...
पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या न्यू चंडीगडच्या मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रोहित शर्मानं नवा पार्टनर जॉनी बेअरस्टोच्या साथीनं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केली. पावरप्लेमध्ये रोहित शर्माचा पहिला कॅच अवघ्या ३ धावांवर सुटला. त्यानंतर तो १२ धावांवर खेळत असतानाही गुजरातसाठी त्याच्या विकेटची संधी निर्माण झाली होती. पण विकेट मागे कुशल मेंडिसनं ही संधी गमावली. मग रोहित शर्मानं २८ चेंडूत अर्धशतक झळकावले. एलिमिनेटरच्या सामन्यात तो शतकी खेळी करेल, असे वाटत होते. पण ८१ धावांवर तो झेलबाद झाला. रोहित शर्मानं महत्त्वपूर्ण सामन्यात ५० चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ८१ धावांची दमदार खेळी केली. शतक हुकले असले तरी प्लेऑफ्समध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे.
प्लेऑफ्समध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावसंख्ये करणारे फलंदाज
आयपीएलच्या प्लेऑफ्समध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड याआधी सूर्यकुमार यादवच्या नावे होता. २०१९ च्या हंगामात सूर्यकुमार यादवनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात नाबाद ७१ धावांची खेळी केली होती. याशिवाय २०१३ च्या हंगामात ड्वेन स्मिथ याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध ६८ धावांची खेळी केली होती. आता या यादीत रोहित शर्मा ८१ धावांसह टॉपला पोहचलाय.