आयपीएल २०२५ च्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून खेळणारा फिरकीपटू दिग्वेश सिंह राठी याने आपली खास छाप सोडलीये. आपल्या फिरकीतील जादू दाखवताना विकेट घेतल्यावर नोटबूक स्टाइल सेलिब्रेशनसह तो अधिक चर्चेत राहिला. प्रत्येक सामन्यात विकेट्स घेतल्यावर आपल्या हटके स्टाईलमध्ये तो विकेट्सची नोंद करून ठेवताना पाहायला मिळाले. या सेलिब्रेशनमुळे तो लक्षवेधी ठरला. पण दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने त्याच्यावर कारवाईही केली. दंडात्मक स्वरुपात त्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. इथं एक नजर टाकुयात IPL मध्ये त्याला किती पगार मिळाला अन् शायनिंग मारण्याच्या नादात त्याने त्यातला किती पैसा उडवला त्यासंदर्भातील माहिती
शायनिंग मारण्याच्या नादात एका मॅचला मुकणार; पगाराला कात्री लागली ते वेगळंच
आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १९ मे रोजी झालेल्या लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स दिग्वेश राठीनं घेतल्या. अभिषेक शर्माला आउट केल्यावर त्याने नोटबूक स्टाइल सेलिब्रेशन केले. सुरुवातीच्या काळात दंडात्मक कारवाई झाल्यानंतर ग्राउंडवर विकेट्सची नोंद करून ठेवताना दिसलेला दिग्वेशनं यावेळी पुन्हा आपला जुना तोरा दाखवून देत अभिषेक शर्माला डिवचले. सामन्यानंतर तो अभिषेकच्या गळ्यात गळा घालून अगदी गोडीगुलाबीनं वावरताना दिसला. पण मैदानातील कृत्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय दंडात्मक स्वरुपात पगार कपातीची कारवाई झाली ती वेगळीच.
IPL 2025: मैदानावर भिडणं पडलं महागात; LSG च्या दिग्वेश राठीवर IPL प्रशासनाची कठोर कारवाई
विकेट्सचा हिशोब ठेवण्याच्या झाला एवढ्या लाखांचा घाटा
पदार्पणाच्या हंगामात १ एप्रिलला पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर पहिल्यांदा दंडात्मक कारवाई झाली होती. प्रियंश आर्य याच्यासमोर तेवर दाखवल्यावर १.८७ लाख एवढा दंड त्याला भरावा लागला. पण त्याच्यात काही सुधारणा झाली नाही. ४ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यानंतही त्याच्यावर ३.७५ लाख रुपयांच्या स्वरुपात दंडात्मक कारवाई झाली. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातील कारवाईसह आतापर्यंत त्याने ९.३७ लाख एवढी रक्कम दंडात्मक स्वरुपात मोजली आहे. लखनौनं ३० लाख एवढ्या किंमतीसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. IPL मध्ये मिळालेला बहुतांश पगार त्याने मैदानात रुबाब झाडण्यातच खर्च केल्याचे दिसते. दिग्वेश राठीची IPL २०२५ स्पर्धेतील कामगिरी
दिग्वेश राठी हा लखनौच्या ताफ्यातून सुरुवातीपासून प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला. त्याने १२ सामन्यात १४ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. नोटबूक स्टाईल सेलिब्रेशनमुळे गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्याला तो मुकणार असून यंदाच्या हंगामातील साखळी फेरीत तो रॉयल चॅलेंजर्सु बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात पुन्हा खेळताना दिसू शकतो.