IPL 2025 : "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..." सेहवागनंतर दुसरा त्रिशतकवीर ठरला! पण...

टीम इंडियाकडून कसोटीत त्रिशतक झळकवणारा सेहवागनंतरचा तो दुसरा फलंदाज आहे. पण तरीही टीम इंडियाकडून तो १० सामने खेळू शकला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:33 IST2025-04-16T13:26:10+5:302025-04-16T13:33:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 DC vs RR 32nd Match Lokmat Player to Watch Karun Nair Delhi Capitals | IPL 2025 : "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..." सेहवागनंतर दुसरा त्रिशतकवीर ठरला! पण...

IPL 2025 : "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..." सेहवागनंतर दुसरा त्रिशतकवीर ठरला! पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 DC vs RR 32nd Match Player to Watch Karun Nair Delhi Capitals :  एक शतक ठोकले की, पुढच्या किमान १० सामन्यांसाठी टीम इंडियातील जागेवर रुमाल टाकणारे अनेक चेहरे आहेत. स्टार संस्कृतीमुळे काहीजण तर एका शतकावर वर्षभर खेळतानाही पाहायला मिळते. पण या गर्दीत ३०० धावांची विक्रमी खेळी केल्यावरही करुण नायरवर 'दर्दी' होण्याची वेळ आली. टीम इंडियाकडून कसोटीत त्रिशतक झळकवणारा सेहवागनंतरचा तो दुसरा फलंदाज आहे. पण तरीही टीम इंडियाकडून तो १० सामने खेळू शकला नाही.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

'डियर क्रिकेट' असं म्हणत साद घातली अन्... 

 करुण नायर याला टीम इंडियाकडून अधिक संधी का मिळाली नाही?  हा प्रश्न म्हणजे "विषय खोल अन् मोठा झोल" असाच काहीसा आहे. राष्ट्रीय संघातून डावलण्यात आलेल्या कर्नाटकच्या या स्टार बॅटरवर राज्य क्रिकेट संघानंही भरवसा दाखवला नाही. हे सगळं घडत असताना त्याने डियर क्रिकेट... असं म्हणत एक संधी हवी अशी साद घातली. विदर्भाच्या संघानं त्याला ती संधी दिली अन् आता आयपीएलमध्ये "नायर ऑन फॉयर..." शो पाहायला मिळत आहे.

IPL 2025 : RCB सह DC साठी बिन कामाचा ठरला! मग RR नं दाखवला या 'हार्ड हिटिंग फिनिशर'वर भरवसा

घरच्या टीमकडूनही 'टोलवाटोलवी'चा डाव 

करुण नायर म्हणजे कमालीचा प्रतिभा असणारा फलंदाज आहे. टीम इंडियाकडून आपल्यातील क्षमता सिद्ध करुनही तो दुर्लक्षित राहिला. टीम इंडियाकडून ३०० धावा ठोकल्यावर त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. एवढेच नाही घरच्या टीमनेही त्याच्यासोबत 'टोलवाटोलवी' डाव खेळला. करुण नायरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकच्या संघाकडून खेळण्याची इच्छा होती. यासाठी त्याने प्रयत्नही केले. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये या संघाने त्याला जी संधी हवी ती काही दिली नाही. 

 "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..."

एका बाजूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून तो रिप्लायची वाट बघत असताना दुसऱ्या बाजूला त्रिशतकवीराला विदर्भाकडून ऑफर आली. या संघाकडून त्याला सातत्यपूर्ण खेळायची संधी मिळण्याची गॅरेंटी होती. त्यामुळेच त्याने कर्नाटकचा संघ सोडून विदर्भकर होण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफीसह रणजी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करून दाखवत पुन्हा त्याने टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले. एका बाजूला तो पुन्हा टीम इंडियात येईल अशी चर्चा रंगत असताना आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाने त्याच्यावर भरवसा दाखवला. पहिल्याच सामन्यात धमाकेदार खेळी करत त्याने ३ वर्षांनी तोऱ्यात कमबॅक करुन यंदाच्या हंगामातील उर्वरित प्रत्येक सामन्यात संधी मिळेल, अशी खेळी करून दाखवलीये. 

IPL मध्ये कसा आहे त्याचा रेकॉर्ड

करुण नायर याने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. ७७ सामन्यात ११ अर्धशतकासह त्याने १५८५ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून दमदार कमबॅक करताना मुंबई इंडियन्स विरुद्ध करुण नायर याने ४० चेंडूत केलेली ८९ धावांची खेळी केली. ही त्याची आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे. याआधी तो पंजाब, कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स संघाचाही भाग राहिला आहे. 

Web Title: IPL 2025 DC vs RR 32nd Match Lokmat Player to Watch Karun Nair Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.