Bhuvneshwar Kumar Becomes IPLs 2nd Leading Wicket Taker : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात अनुभवी भुवनेश्वर कुमारनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह भुवनेश्वर कुमार आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. आता युझवेंद्र चहल पाठोपाठ त्याचा नंबर लागतो.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध भुवीचा भेदक मारा
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार याने चार षटकांत ३३ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. यात त्याने केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांना तंबूचा रस्ता दाखवला. भुवीच्या भेदक माऱ्याच्या जोरावरच आरसीबीच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित २० षटकांत ८ बाद १६२ धावांवर रोखल्याचे पाहायला मिळाले.
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात भुवीनं माजी फिरकीपटू पियुष चावलाच्या १९२ आयपीएल विकेट्सचा विक्रम मागे टाकला आहे. भुवनेश्वर कुमारनं १८५ सामन्यांमध्ये २७.०१ च्या सरासरीने १९३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जलदगती गोलंदाजांच्या यादीत तो आधीपासून पहिल्या क्रमांकावर आहे. आता आयपीएलमध्ये सर्वकालिन सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत तो दुसऱ्या् क्रमांकावर पोहचलाय. या यादीत पंजाब किंग्जकडून खेळणारा युजवेंद्र चहल अव्वलस्थानी आहे. त्याने आतापर्यंत २१४ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- २१४ - युजवेंद्र चहल
- १९३ – भुवनेश्वर कुमार*
- १९२ - पियुष चावला
- १८७ - सुनील नरेन
- १८५ - आर. अश्विन
- १८३ - ड्वेन ब्रावो