आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ४६ व्या सामन्यात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्ससमोर रजत पाटीदारच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे तगडे आव्हान असणार आहे. दोन्ही संघ सामना जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान होण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. बंगळुरुच्या संघाने यंदाच्या हंगामात बाहेरच्या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. ते हा तोरा टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतील. हे आव्हान परतवून लावण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून पुन्हा एकदा मिचेल स्टार्कवर नजरा असतील. ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने परफेक्ट यॉर्करसह आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एक 'पंजा'ही मारलाय अन् सुपर ओव्हरमध्ये सामनाही फिरवलाय
मिचेल स्टार्क हा वर्ल्ड क्लास बॉलर आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून त्याने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला. टी-२० कारकिर्दीतील पहिल्यांदाच त्याने ही कामगिरी करून दाखवली. एवढेच नाही तर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने परफेक्ट यॉर्कर लेंथचा मारा करत आधी सामना सुपर ओव्हरमध्ये नेला अन् शवटी सुपर ओव्हरमध्येही तोच तोरा दाखवून संघाला विजय मिळवून दिला. खास गोलंदाजीमुळे तो दिल्लीची आस झालाय. पुन्हा एकदा त्याच्याकडून भेदक माऱ्याची अपेक्षा असेल.
IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'! RCB साठी हुकमी एक्का ठरतोय हा गोलंदाज
कोहली-सॉल्टचं चॅलेंज
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून मैदानात उतरणाऱ्या डावखुऱ्या गोलंदाजासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सलामीवीरांचे मोठे चॅलेंज असेल. कारण आतापर्यंत टीृ२०- क्रिकेटमध्ये त्याला विराट कोहली आणि फिल सॉल्टची विकेट घेता आलेली नाही. विराट कोहलीनं स्टार्कसमोर ५१ चेंडूत ८८ धावा केल्या आहेत. दुसरीकडे सॉल्टनं १९ चेंडूत त्याच्या विरुद्ध ४४ धावा कुटल्या आहेत. स्टार्क या जोडीसमोर कशी गोलंदाजी करणार ते पाहण्याजोगे असेल.
IPL मधील स्टार्कची कामगिरी
२०१४ च्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या स्टार्कनं आतापर्यंत ४९ सामन्यात ६२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यात यंदाच्या हंगामात ८ सामन्यात ११ विकेट्सचा समावेश आहे. ३५ धावा खर्च करून ५ विकेट्स ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरीही दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतानाच आली आहे. घेतल्या आहेत.
Web Title: IPL 2025 DC vs RCB 46th Match Lokmat Player to Watch Mitchell Starc Delhi Capitals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.