Join us

DC vs LSG: षटकार किंगचा तोरा! पूरन आता गेल, पोलार्डसह मसल पॉवर रसेलच्या पंक्तीत जाऊन बसला

हा पल्ला गाठणारा तो क्रिकेट जगतातील फक्त चौथा खेळाडू ठरलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 23:07 IST

Open in App

IPL 2025 DC vs LSG Nicholas Pooran Smashes 600th T20 Six Record : विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात लखनौच्या नवाबांच्या ताफ्यातून निकोलस पूरन याने तुफानी खेळीचा नजराणा पेश केला. कॅरेबियन स्टार निकोलस पूरन याने पुन्हा एकदा टी-२० क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज असल्याचे दाखवून दिले. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजावर तुटून पडलेल्या वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनं उत्तुंग फटकेबाजीसह टी२० क्रिकेटमध्ये ६०० सिक्सर मारणाऱ्या दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. हा पल्ला गाठणारा तो क्रिकेट जगतातील फक्त चौथा खेळाडू ठरलाय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिला षटकार मारताच गाठला मैलाचा पल्ला

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून पहिला षटकार आला अन् त्याने ६०० सिक्सरचा टप्पा गाठला. लखनौच्या डावातील  सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर निगमच्या गोलंदाजीवर त्याने हा मैलाचा पल्ला गाठला. पूरनने ३८५ व्या टी-२० सामन्यात ६०० षटकार मारण्याचा खास विक्रम सेट केला आहे. 

नव्या संघाकडून Mitchell Marsh नं जुन्या फ्रँचायझी संघाला धुतलं; IPL मध्ये जलद अर्धशतकही ठोकलं

गेल, पोलार्ड अन् मसल पॉवर रसेलच्या पक्तींत जाऊन बसला पूरन

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने या छोट्या फॉर्मेटमध्ये  ४६३ सामन्यात १०५६ षटकार मारले आहेत. त्याच्या पाठोपाठ या यादीत केरॉन पोलार्डचा नंबर लागतो. या कॅरेबियन दिग्गजाने आपल्या टी-२० कारकिर्दीत ९०८ षटकार मारले आहेत.  आंद्रे रसेल या यादीत ७३३ षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर असून या पूरन आता दिग्गजांच्या पक्तींत जाऊन बसला आहे.

एका षटकात कुटल्या २८ धावा

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निकोल पूरन याने ३० चेंडूत ७५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ खणखणीत चौकारांसह ७ उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. लखनौच्या डावातील १३ व्या षटकात स्टब्सच्या एका  षटकात त्याने २८ धावा केल्या. या षटकात त्याच्या भात्यातून ४ षटकार आणि एक चौकार आला. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५दिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्सटी-20 क्रिकेट