Join us

IPL 2025 : DC च्या ताफ्यातील दोन वेळच्या चॅम्पियनसाठी KKR विरुद्धचा सामना असेल खास; कारण...

इथं एक नजर टाकुयात आयपीएलमधील त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:55 IST

Open in App

IPL 2025 DC vs KKR 48th Match   Player to Watch Faf du Plessis Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२५ स्पर्धेतील ४८ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना फाफ ड्युप्लेसी याच्यासाठी एकदम खास असेल. कारण तो १५० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात १० खेळाडूंनी २०० आयपीएल सामने खेळले असून १५० सामने खेळणाऱ्या खेळाडूंचा आकडा हा १९ इतका आहे. फाफ ड्युप्लेसी कोलकाता विरुद्धच्या सामन्यात १५० सामने खेळणारा २० वा खेळाडू ठरेल. इथं एक नजर टाकुयात आयपीएलमधील त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर 

दोन वेळचा IPL चॅम्पियन आहे फाफ

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज २०१२ च्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळताना दिसतोय. २०१८ आणि २०२१ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला जेतेपद मिळवून देण्यात फाफने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. २०२१ च्या हंगामात फायलमध्ये त्याने ५९ चेंडूत ८६ धावांची खेळी केली होती.  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने ही क्लास खेळी केली होती.

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी

DC च्या ताफ्यातून खेळताना दुहेरी जबाबदारी

आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत १४९ सामन्यात त्याने ३८ अर्धशतकाच्या मदतीने ४६७४ धावा केल्या असून ९६ ही त्याची या स्पर्धेतील सर्वाच्च धावसंख्या आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने रिलीज केल्यावर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळाले होते.  दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतल्यावर उपकर्णधारपद दिले आहे. याशिवाय संघाच्या डावाला दमदार सुरुवात करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे.

 मांडीच्या दुखापतीमुळे बाकावर बसण्याची आली वेळ

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात लखनौ विरुद्ध १९ चेंडूत २९ धावांच्या खेळीसह दमदार सुरुवात केल्यावर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध फाफच्या भात्यातून २७ चेंडूत क्लास अर्धशतक पाहायला मिळाले. पण त्यानंतर मांडीच्या दुखापतीमुळे त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ आली. कमबॅक करताना बंगळुरु विरुद्ध त्याने २६ चेंडूत २२ धावांची खेळी केली. आता कोलकाता विरुद्ध त्याच्याकडून यापेक्षा दमदार खेळीची अपेक्षा असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५एफ ड्यु प्लेसीसदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट