भारतीय क्रिकेटमधील स्टायलिश क्रिकेटर केएल राहुल याने टी-२० क्रिकेट कारकिर्दीत एक मैलाचा पल्ला पार केला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पाचवे शतक झळकावले. या खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ८००० धावांचा पल्ला गाठलाय. सर्वात जलगतीने हा टप्पा पार करत त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. याआधी भारताकडून टी-२० क्रिकेमध्ये सर्वात जलद ८००० धावा करण्याचा विक्रम हा कोहलीच्या नावे होता. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात ३३ धावा करताच केएल राहुलने हा विक्रम आपल्या नावे केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लोकेश राहुलनं किंग कोहलीचा विक्रम मोडला
लोकेश राहुलने ८,००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी २२४ डाव खेळले. कोहलीपेक्षा १९ डाव कमी खेळत त्याने नवा विक्रम सेट केला. केएल राहुल हा टी-२० क्रिकेटमध्ये ८,००० धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा सर्वात जलद फलंदाज आहे. या यादीत ख्रिस गेल सर्वात आघाडीवर आहे.
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने ८००० धावा करणारे फलंदाज
- ख्रिस गेल - २१३ डाव
- बाबर आझम - २१८ डाव
- केएल राहुल - २२४ डाव
- विराट कोहली - २४३ डाव
- मोहम्मद रिझवान - २४४ डाव
यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करताना दिसतोय केएल राहुल
केएल राहुल हा यंदाच्या हंगामात कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्याआधीत ११ सामन्यांत त्याने ५० पेक्षा अधिकच्या सरासरीसह १४२ च्या स्ट्राईक रेटने ४२२ धावा केल्या होत्या. गुजरात विरुद्धच्या सामन्यातील शतकी खेळीसह त्याने यात आणखी भर घातली. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ६५ चेंडूत ११२ धावांची नाबाद खेळी केली.