IPL 2025 DC vs GT 60th Match Player to Watch Gujarat Titans : दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स संघ यजमान दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर शह देऊन प्लेऑफ्सचं तिकीट पक्के करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. गुजरातच्या संघाच्या आतापर्यंतच्या प्रवासात कर्णधार शुबमन गिलसह साई सुदर्शन या जोडीनं हिट कामगिरी करून दाखवलीये. या दोघांशिवाय जोस बटलरही संघासाठी उपयुक्त खेळी करताना दिसला आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात ६ फलंदाजांनी ५०० धावांचा पल्ला गाठलाय. त्यात गुजरातच्या तिघांचा समावेश आहे. त्यामुळेच या त्रिकूटाला रोखण्याचे मोठे चॅलेंज दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर असेल. इथं एक नजर टाकुयात या तिघांची कशी राहिलीये यंदाच्या हंगामातील कामगिरी त्यावर एक नजर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साई सुदर्शनची आश्वासक खेळी
गुजरातकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत साई सुदर्शन सर्वात आघाडीवर आहे. त्याने ११ सामन्यातील ११ डावात ५०९ धावा केल्या आहेत. त्याच्या भात्यातून ५ अर्धशतके पाहायला मिळाली असून आतापर्यंत त्याने ५६ चौकारांसह १६ षटकार मारले आहेत. आक्रमक अंदाजात सुरुवात करण्यापेक्षा आश्वासक खेळीसह तो डाव पुढे नेण्याला पसंती देतो. त्याची ही शैली संघासाठी फायद्याचेही ठरले आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत साई सुदर्शन हा यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
शुबमन गिलचा तोराही एकदम क्लास
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल हा देखील साई सुदर्शनप्रमाणे उलटे सुलटे फटके मारण्यापेक्षा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्ससह डावाला आकार देताना दिसते. त्याने ११ सामन्यातील ११ डावात ५ अर्धशतकाच्या मदतीने त्याने ५०८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या भात्यातून आतापर्यंत ५१ चौकारासह १६ षटकार पाहायला मिळाले आहेत.
जोस बटलरचीही धमाकेदार कामगिरी
जोस बटलर यानेही यंदाच्या हंगामात पाच अर्धशतके झळकावली आहेत. ११ सामन्यातील ११ डावात त्याच्या खात्यात ५०० धावा जमा असून यात एकदा तो नव्वदीच्या घरातही पोहचलाय. त्याच्या भात्यातून ४९ चौकारांसह २२ षटकार पाहायला मिळाले आहे. हाच तोरा तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दाखवेल, अशी अपेक्षा आहे.