Join us

KL Rahul Equals Virat Kohli Record : केएल राहुलचा मोठा पराक्रम; किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या अर्धशतकी खेळीसह लोकेश राहुलनं साधला विक्रमी डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 20:27 IST

Open in App

IPL 2025 KL Rahul Equals Virat Kohli Record : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १७ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करून दाखवले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून लोकेश राहुलनं सलामीला फलंदाजी करताना दमदारअर्धशतक झळकावले. या  अर्धशतकी खेळीसह लोकेश राहुलनं  खास विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अर्धशतकी खेळीसह केएल राहुलनं केली किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या रुपात पहिल्याच षटकात पहिली विकेट  गमावली. पण दुसऱ्या सलामीवीराने आपली जबाबदारी चोख पार पाडत अर्धशतकी खेळीस संघाचा डाव सावरला. केएल राहुलनं या सामन्यात ३३ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने अर्धशतक साजरे केले. या  खेळीसह त्याने किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

KL राहुलची क्लास फिफ्टी! 'घरवाली' अथियानं शेअर केली 'लव्ह वाली' स्टोरी

सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड

आयपीएलच्या कारकिर्दीतील ३८ वे शतक झळकावताना त्याने सलामीला फलंदाजी करताना  ४० व्या वेळी ५० पेक्षा अधिक धावांचा खास विक्रम साधला. विराट कोहलीनंही आयपीएलमध्ये ४० वेळा अशी कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत आता ही जोडगोळी संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. 

डेविड वॉर्नरच्या नावे आहे सर्वाधिक फिफ्टी प्लसचा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५० प्लस धावा करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन बॅटर डेविड वॉर्नरच्या नावे आहे. त्याने सलामीला फलंदाजी करताना ६० वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत शिखर धवनचे नाव दिसून येते.   त्यानंतर या यादीत केएल राहुल आणि विराट कोहलीचा नंबर लागतो. 

IPL मध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे सलामीवीर   

  • ६० - डेविड वॉर्नर
  • ४९ - शिखर धवन
  • ४० - केएल राहुल 
  • ४० - विराट कोहली

 

केएल राहुलनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ५१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावरच दिल्लीच्या संघाने धावफलकावर १८० पेक्षा अधि धावा लावल्या आणि चेन्नई सुपर किंग्जला रोखत २५ धावांनी विजय नोंदवला. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५दिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्सलोकेश राहुलविराट कोहलीइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट