MS Dhoni Seen Taking Care Of His Bat Hammering It And Checking It With Gauge Inside Dressing Room : चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ४३ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदा फलंदाजी करताना CSK च्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकली. परिणामी पॉवरप्लेमध्येच रवींद्र जडेजा फलंदाजीला आल्याचे पाहायला मिळाले. तो मैदानात उतरल्यावर पंचांनी त्याची बॅट तपासली अन् गेज चाचणीत त्याची बॅट नियमबाह्य ठरली. परिणामी त्याच्यावर बॅट बदलण्याची वेळ आली. मैदानात हा प्रकार घडत असताना ड्रेसिंग रुममध्येही याची प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. "रिस्क नको रे बाबा.." या मूडमध्ये धोनी आपल्या बॅटची काळजी घेताना दिसला. ड्रेसिंग रुममधील धोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जड्डूची चोरी पकडली गेल्यावर धोनीचा सावध पवित्रा
सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद शमीनं CSK चा युवा सलामीवीर शेख रशीद याला झेलबाद केले. चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हर्षल पटेल याने सॅम कुरेन याला ९ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. पॉवर प्लेमध्ये पहिल्या दोन विकेट्स गमावल्यावर रवींद्र जडेजाला बढती मिळाली. तो मैदानात उतरल्यावर अंपायरने आपल्या खिशातील बॅट गेज काढले अन् जड्डू फसला. त्याची बॅट नियमानुसार नसून अधिक जाड असल्याचे दिसून आले. परिणामी त्याला बॅट बदलावी लागली. त्याची ही चोरी पकडली गेल्यावर ड्रेसिंग रुममध्ये धोनी सावध झाल्याचे पाहायला मिळाले.
CSK vs SRH : 'चोरीचा मामला!' एकही बॉल न खेळता जड्डूवर आली बॅट बदलण्याची वेळ (VIDEO)
ड्रेसिंग रुममध्ये MS धोनीनं काढला हातोडा
एका बाजूला जड्डूची बॅट तपासणी सुरु असताना दुसऱ्या बाजूला कॅमेरा ड्रेसिंगरुमकडे फिरला. जिथं धोनी आपल्यावर ही वेळ येणार नाही, याची खबरदारी घेताना दिसून आले. तो हातोड्याच्या माध्यमातून बॅट ठोकताना दिसले. एवढेच नाही तर धोनीने बॅट गेजच्या माध्यमातून नियमानुसार आपली बॅट ठिक केल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर ड्रेसिंग रुममधील धोनीचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
बॅट ओके पण बॅटिंगमध्ये त्याचा तोरा नाही दिसला
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीही बॅटिंगमध्ये अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. तो १० चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ६ धावा करुन तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. हर्षल पटेलनं त्याला अभिषेक शर्मा करवी झेल बाद केले. चेन्नईकडून डेवॉन ब्रेसवेलनं केलेल्या ४२ धावा वगळता आयुष म्हात्रेनं ३० धावांचे योगदान दिले. घरच्या मैदानावर CSK च्या संघावर १५४ धावांवर ऑल आउट होण्याची नामुष्क ओढावली.
Web Title: IPL 2025 CSK vs SRH MS Dhoni Seen Taking Care Of His Bat Hammering It And Checking It With Gauge Inside Dressing Room After Ravindra Jadeja Caught Cheating By On Field Umpire Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.