Join us

IPL 2025 : दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱ्या पठ्ठ्यानं घेतला IPL मधील सर्वोत्तम कॅच; इथं पाहा व्हिडिओ

यंदाच्या हंगामातीलच नव्हे तर त्याने घेतलेला कॅच हा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम कॅचपैकी एक आहे, अशा प्रतिक्रिया त्याच्या कॅचवर उमत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 22:12 IST

Open in App

Kamindu Mendis Takes A Stunner Catch To Dismiss Dewald चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघातील  श्रीलंकेच्या अष्टपैलू खेळाडू कामिंदू मेंडिसने (Kamindu Mendis) एक जबरदस्त कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातीलच नव्हे तर त्याने घेतलेला कॅच हा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम कॅचपैकी एक आहे, अशा प्रतिक्रिया त्याच्या कॅचवर उमत आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

CSK ची पुन्हा खराब सुरुवात, डाव डेवॉन ब्रेविसनं सावरला डाव, पण...

चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट गमावल्यावर ठराविक अंतराने चेन्नईच्या संघाने विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले. संघ संकटात असताना चेन्नईकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या डेवॉन ब्रेविस याने कमालीची खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याच्या खेळीच्या जोरावर चेन्नईचा संघ सनरायझर्स हैदराबादसमोर मोठे चॅलेंज ठेवेल, असे वाटत असताना कामिंदू मेंडिस याने एका अप्रतिम कॅचवर त्याच्या इनिंगला ब्रेक लावला. 

CSK vs SRH : 'चोरीचा मामला!' एकही बॉल न खेळता जड्डूवर आली बॅट बदलण्याची वेळ (VIDEO)

दोन हातांनी गोलंदाजी करणाऱ्या पठ्याची कमाल

चेन्नईच्या डावातील १३ व्या षटकात हर्षल पटेल गोलंदाज करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर ब्रेविसनं एक जबरदस्त षटकार मारला. पुढच्या चेंडूवरही त्याने मोठा फटका खेळला. हा चेंडूही सीमारेषेपलिकडेच जाईल, असे वाटत होते. पण कामिंदू मेंडिसनं लाँग ऑनवरून धावत येत लांब उडी मारत कव्हरच्या दिशेने जाणारा चेंडू कॅचमध्ये रुपांतरित केला. दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन अष्टपैलू खेळाडूनं जबरदस्त कॅच पकडत ब्रेविसच्या खेळीला ४२ धावांवरच ब्रेक लावला. स्टँडमध्ये उपस्थितीत संघ मालकीण काव्या मारन हिनेही मेंडिसच्या कॅचला दाद दिल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट