Join us

IPL 2025 : मोठ्या अपेक्षेसह CSK नं त्याचा पगार तिप्पट केला; पण...

शिवम दुबे याने यंदाच्या हंगामात २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:44 IST

Open in App

IPL 2025 CSK vs SRH 43rd Match Player To Watch Shivam Dube Chennai Super Kings : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. पाच वेळच्या चॅम्पियन संघातील सलामीवीरांचा फ्लॉप शो, मध्यफळीतील फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी टाकलेली नांगी अशा एक ना अनेक कारणांमुळे CSK संघ स्पर्धेबाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेला शिबम दुबे हा यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून २०० धावांचा आकडा गाठणारा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी  प्रत्येक सामना जिंकण्याचे आव्हान असताना तो आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करून संघासाठी किती योगदान देणार ते पाहण्याजोगे असेल.   

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२०० पेक्षा अधिक धावा काढल्या, पण...

शिवम दुबे याने यंदाच्या हंगामात २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. पण स्ट्राइक रेटमुळे CSK चा हिरो यंदाच्या हंगामात संघासाठी खलनायक ठरतो. ८ सामन्यातील ८ डावात दोन वेळा नाबाद राहून त्याने ३८.३३ च्या सरासरी आणि १३३.७२ च्या स्ट्राइक रेटनं एका अर्धशतकाच्या मदतीने २३० धावा केल्या आहेत. ५० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून त्याच्या भात्यातून १५ चौकार आणि १३ षटकार पाहायला मिळाले आहेत.

सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?

CSK ला चॅम्पियन करण्यात उचलला होता मोलाचा वाटा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या भात्यातील मोठ्या फटकेबाजीसह गोलंदाजीतील उपयुक्तता सिद्द करून २०१९ मध्ये शिवम दुबेनं RCB च्या संघाक़डून आयपीएलमध्ये पदार्पण केले. दोन हंगाम या संघाकडून खेळल्यावर तो २०२१ च्या हंगामात RR च्या ताफ्यातून खेळताना दिसले.  २०२२ च्या हंगामापासून तो CSK च्या ताफ्यात आहे. या संघात आल्यापासून त्याची कामगिरी उंचावल्याचे पाहायला मिळाले. CSK कडून पदार्पणाच्या हंगामात नाबाद ९५ धावांसह त्याने ११ सामन्यात २८९ धावा केल्या होत्या.  २०२३ च्या हंगामात चेन्नई सुप किंग्जच्या संघाला चॅम्पियन करण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. या हंगामा १६ सामन्यात त्याच्या भात्यातून ३ अर्धशतकासह ४१८ धावा आल्या होत्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.  

तिप्पट पगारवाढीस CSK नं त्याच्यावर भरवसा दाखवला, पण..

गत हंगामात शिवम दुबेनं १४ सामन्यात ३ अर्धशतकाच्या मदतीने ३९६ धावा केल्याचे पाहायला मिळाले. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे CSK संघाने त्याच्यावर भरवसा दाखवत मेगा लिलावाआधी तिप्पट रक्कम मोजून आपल्या ताफ्यासोबत कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. ३ हंगामात ४ कोटी घेणाऱ्या गड्याला १२ कोटीच पॅकेज मिळाले. पण या पैशांच्या तुलनेत त्याच्या कामगिरी एकदमच शुल्लक दिसते. उर्वरित सामन्यात तरी तो पैसा वसूल शो दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट