Virat Kohli T20 Records IPL 2025 CSK vs RCB: चेन्नई: बंगळुरूचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आज शुक्रवारी आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध खेळेल तेव्हा टी-२० मध्ये (आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल) १३ हजार धावांचा टप्पा गाठण्याची त्याच्याकडे संधी असेल, त्यासाठी विराटला ५५ धावांची गरज आहे. यंदा आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध विराट खेळला तेव्हा तो त्याचा ४०० वा टी-२० सामना होता, त्याने ३६ चेंडूंत नाबाद ५९ धावा केल्या, आता झटपट क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान धावा काढण्यात तो दुसऱ्या स्थानावर येऊ शकतो. सध्या ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे.
टी२० आकडेवारी
- सामने - ४००
- डाव - ३८३
- स्ट्राइक - १३४.३१
- सरासरी - ४१.६२
- धावा - १२,९४५
- शतके - ९
- अर्धशतके - ९८
- सर्वोच्च - १२२*
विराटला खुणावतोय मोठा विक्रम
- विराटने चेन्नईविरुद्ध ५५ धावा केल्यास तो टी-२० व्या इतिहासात १३ हजार धावा काढणारा पहिला भारतीय फलंदाज बनेल.
- याशिवाय विराट १३ हजार धावांचा टप्पा गाठणारा एकूण ५ वा खेळाडू बनणार आहे.
टी-२० तील १३ हजारी फलंदाज
फलंदाज - देश - डाव
- ख्रिस गेल - वेस्ट इंडिज - ३८१
- अलेक्स हेल्स - इंग्लंड - ४७४
- शोएब मलिक - पाकिस्तान - ४८७
- किरोन पोलार्ड - वेस्ट इंडिज - ५९४
चेन्नईविरुद्ध विराट कोहलीची कामगिरी
- सामने ३२
- धावा - १,०५३
- स्ट्राइक रेट - १२६
- अर्धशतके - ९