IPL 2025 CSK vs RCB 8th Match Player to Watch Virat Kohli : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात यंदाच्या आयपीएल हंगामातील आठवा सामना रंगणार आहे. एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे पारडे जड आहे. दोन्ही संघाता आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या ३३ सामन्यात २१ वेळा चेन्नईच्या संघानं बाजी मारलीये. एवढेच नाही घरच्या मैदानात खेळलेल्या ९ सामन्यातील फक्त १ सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जिंकता आला आहे. गत हंगामात या मैदानात झालेल्या सामन्यातही चेन्नई सुपर किंग्जच्या संघानेच बाजी मारली होती. धोनीच्या सीएसकेच्या बालेकिल्ल्यातील हा खराब रेकॉर्ड विसरून मैदान गाजवायचे असेल तर पुन्हा एकदा विराट कोहलीलाच पुढाकार घ्यावा लागेल. तो आरसीबीचा 'उजवा हात'च आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
CSK विरुद्ध कोहलीचा रेकॉर्डही एकदम भारी
"जिथं मॅटर मोठा तिथं कोहली सगळ्यात पुढे असतो. आयपीएलमध्ये चन्नई सुपर किंग्जचा संघही याला अपवाद नाही. ज्या ज्या वेळी हे दोन संघ समोरासमोर आलेत त्या त्या वेळी विराट कोहली दमदार कामगिरी करून दाखवत या संघातील गोलंदाजांना नडल्याचा रेकॉर्ड आहे. आयपीएलच्या इतिहासात कोहलीनं चेन्नई सुपर किग्ज विरुद्ध ३२ सामन्यात १०५३ धावा केल्या असून नाबाद ९० धावा ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे.
IPL 2025: MS धोनीच्या CSK विरूद्ध '१३ हजारी' बनण्याची विराट कोहलीला मोठी संधी!
कोहलीला हा मोठा डाव साधण्याचीही संधी
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी विरुद्ध सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत किंग कोहली सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल्स दिल्ली डेअरडेविल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यासारख्या वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना शिखर धवनने चेन्नई विरुद्ध सर्वाधिक १०५७ धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडीत काढत CSK विरुद्ध सर्वाधिक धावा करण्यासाठी कोहलीला फक्त ६ धावांची गरज आहे. चेपॉकच्या मेदान तो या यादीत टॉपला जाईल, अशी अपेक्षा आहे.
विराटला इथं डावखुऱ्या गोलंदाजांनी दमवलंय, यावेळीही असेल मोठे चॅलंज
चेपॉकच्या मैदानात खेळलेल्या १३ सामन्यात विराट कोहली चार वेळा डावखुऱ्या गोलंदाजाचा शिकार झालाय. यात ऑस्ट्रेलियन मध्यम जलदगती डग बॉलिंजर याने एकदा तर शादाब जकाती या लेग स्पिनरनं कोहलीला दोन वेळा बाद केले आहे. जड्डूनंही एकदा कोहलीची विकेट घेतली आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पुन्हा त्याच्यासमोर डावखुऱ्या गोलंदाजाचा सामना करण्याचे मोठे चॅलेंज असेल रवींद्र जडेजासह अहमद नूर कोहलीसमोर आव्हान निर्माण करू शकतो. या दोन डावखुऱ्या फिरकीपटूंचा कोहली कसा सामना करतो ते बघण्याजोगे असेल.
Web Title: IPL 2025 CSK vs RCB 8th Match Lokmat Player to Watch Virat Kohli Royal Challengers Bangalore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.