चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसनंतर प्रेझेंटर आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर डॅनी मॉरिसन याने चेपॉक स्टेडियमवरील धोनी-धोनी.. नावाचा कल्ला बघून CSK चा कर्णधार MS धोनीला आगामी हंगामात पुन्हा आयपीएल खेळणार का? असा प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले. यावर धोनीनं हटके रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL च्या पुढच्या हंगामातही मैदानात उतरणार का? धोनीनं असा दिला रिप्लाय
टॉस गमावल्यावर महेंद्रसिंह धोनी ज्यावेळी प्रेझेंटरशी संवाद साधण्यासाठी आला त्यावेळी चेपॉकच्या स्टेडियमवर जमलेल्या प्रेक्षकांनी धोनी नावाचा जयघोष सुरु केला. मागील काही हंगामापासून सातत्याने धोनीच्या निवृत्तीचा मुद्दा चर्चेचा विषय राहिला आहे. यावेळी डॅनी मॉरिसन याने थेट या प्रश्नाला हात न घालता पुढच्या हंगामात खेळणार का? असा प्रश्न विचारत धोनीचा निवृत्तीचा प्लॅन काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर धोनीने हसतमुखाने मी पुढचा सामना खेळेन की, नाही ते माहिती नाही, असे उत्तर दिले.
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
निवृत्तीच्या प्रश्नावर पुन्हा संभ्रम, यंदाच्या हंगामातील कामगिरीवर मात्र थेट बोलला
धोनीनं निवृत्तीसंदर्भातील प्रश्नावर पुन्हा संभ्रमात टाकणारे उत्तर दिले. पण यावेळी त्याने यंदाच्या हंगामातील कामगिरीवर थेट मत व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. घरच्या मैदानात खेळणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण यंदाच्या हंगामात आम्हाला घरच्या मैदानात फायदा उठवता आला नाही. आम्ही फारसे बदल करत नाही. बहुतांश खेळाडू चांगली कामगिरी करत असतील तर संघात एक दोन बदल होतात. पण यंदाच्या हंगामात अनेक बदल करण्याची वेळ आली. लिलावानंतर पहिलाच हंगाम असल्यामुळे कोणता खेळाडू कुठं फिट बसतो ते पाहणेही गरजेचे आहे, असेही तो म्हणाला.