IPL च्या इतिहासातील सगळ्यात उंच गडी! व्हायचं होतं बॅटर; पण आता बॉलर होऊन गाजवतोय मैदान

आता तो आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करत सर्वोत्तम गोलंदाजाच्या रुपात आपली छाप सोडतान दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:21 IST2025-04-30T12:53:21+5:302025-04-30T13:21:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 CSK vs PBKS 49th Match Lokmat Player To Watch Marco Jansen Punjab Kings | IPL च्या इतिहासातील सगळ्यात उंच गडी! व्हायचं होतं बॅटर; पण आता बॉलर होऊन गाजवतोय मैदान

IPL च्या इतिहासातील सगळ्यात उंच गडी! व्हायचं होतं बॅटर; पण आता बॉलर होऊन गाजवतोय मैदान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 CSK vs PBKS 49th Match Player To Watch Marco Jansen Punjab Kings : क्रिकेटमध्ये सगळं ठरल्याप्रमाणे कधीच घडत नाही. त्यामुळेच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असेही म्हटले जाते. खेळाडूंच्या बाबतीतही ही गोष्ट लागू होते. इथं  बॉलर होण्याचं स्वप्न घेऊन आलेला सचिन तेंडुलकर क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजाच्या रुपात घडल्याचे पाहायला मिळाले आहे. एवढेच नाही तर फलंदाजीचं स्वप्न बाळगणारा आर. अश्विन याने  उत्तम गोलंदाजाच्या रुपात  क्रिकेटमध्ये आपली छाप सोडलीये. क्रिकेटच्या मैदानात अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यातीलच एक नाव म्हणजे मार्को यान्सेन. पंजाबच्या ताफ्यातून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर  सध्याच्या घडीला बॉलिंग ऑलराउंडरच्या रुपात ओळखला जातो. बॅटिंगमध्ये उत्तुंग फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या या पठ्याला मुळात एक फलंदाज व्हायचं होतं. पण आता तो आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करत सर्वोत्तम गोलंदाजाच्या रुपात आपली छाप सोडतान दिसतोय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 IPL मधील सर्वात उंच क्रिकेटरला व्हायचं होतं बॅटर, पण.. 

तुम्हाला माहितीये का? दक्षिण आफ्रिकेचा हा क्रिकेटर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात उंच क्रिकेटर आहे. त्याची उंची  २.०६ मीटर (६ फूट ८ इंच) इतकी आहे. मार्को यान्सेन (Marco Jansen) याचा जुळा भाऊ डुआन यान्सेन (Duan Jansen) हा देखील एक क्रिकेटर आहे. दोघांनी वडील कूस यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मार्कोला फलंदाज व्हायचं होते. पण तो एका गोलंदाजाच्या रुपात घडला. वयाच्या १७ व्या वर्षी मोर्कोसह त्याच्या जुळ्या भावाची नेट बॉलरच्या रुपात निवड झाली होती. नेट्समध्ये विराट कोहलीसमोर अचूक टप्प्यावर वेगवान मारा करत मार्कोनं लक्षवेधून घेतले. मग त्याला भारत दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या अंडर १९ संघात स्थान मिळाले. या दौऱ्यावर सर्वाधिक विकेट्स घेत त्याने हवा केली. 

IPL 2025: चेन्नई एक्स्प्रेसच्या डब्यातील नवा प्रवासी! 'बेबी एबी' रुमाल टाकून आपली जागा फिक्स करणार?

मुंबई इंडियन्सच्या संघातून IPL मध्ये एन्ट्री

अंडर १९ संघातून लक्षवेधी कामगिरी केल्यावर मार्को यान्सेन याच्यासाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजेही खुले झाले. २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाक दौऱ्यावर त्याला संघात सामील करून घेतले. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघानं २० लाख या मूळ किंमतीसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. घरच्या मैदानात भारतीय संघाविरुद्ध कसोटीत पदार्पण करण्याआधी २०२१ मध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

IPL मध्ये फ्रँचायझी बदललेल तसे  पॅकेजही वाढले 

मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पदार्पण केल्यावर २०२२ च्या हंगामात तो सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळताना दिसला. वर्षाला ४.२० कोटी पॅकेजसह तो मागील तीन हंगामात SRH संघाचा भाग राहिला. मेगा लिलावात पंजाबच्या संघाने ७ कोटीसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. आतापर्यंत त्याने ३० आयपीएल सामन्यात २८ विकेट्स आणि १३७ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने १११ धावांचा बचाव करून विक्रमी विजय नोंदवला होता. या सामन्यात मार्कोनं आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना १७ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. 

Web Title: IPL 2025 CSK vs PBKS 49th Match Lokmat Player To Watch Marco Jansen Punjab Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.