IPL 2025 CSK vs PBKS 49th Match Player To Watch Dewald Brevis Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्सच्या बरोबरीनं पाच वेळा चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदाच्या हंगामात तळाला आहे. महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन झाला, पण चेन्नई एक्स्प्रेस काही ट्रॅकवर आली नाही. २०२२ च्या हंगामात खांदेपालट झाल्यावर जे घडलं तीच अवस्था CSK ची यंदाच्या हंगामात झालीये. जडेजाच्या कॅप्टन्सीत CSK चा फ्लॉप शो अन् पुन्हा धोनीकडे कॅप्टन्सी असे चित्र त्यावेळी पाहायला मिळाले होते. या बदलानंतर CSK ला रुळावर येण्यासाठी पुढच्या हंगामाची प्रतिक्षा करावी लागली होती. २०२३ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जनं धोनीच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा IPL चे जेतेपद पटकावल्याचे पाहायला मिळाले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नवा गडी नवे प्रयोग
IPL च्या १८ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी प्लेऑफ्सचं जंक्शन गाठणं मुश्कीलच आहे. त्यामुळे हा संघ CSK चा संघ आता उर्वरित सामन्यात आगामी हंगामाच्या दृष्टिने संघ बांधणीला प्राधान्य देताना दिसेल. धोनीनं ही गोष्ट बोलूनही दाखवली आहे. या प्रयोगात डेवाल्ड ब्रेविस हा एक प्रमुख चेहरा असेल. दक्षिण आफ्रिकेचा हा क्रिकेटर याआधी मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना दिसले आहे. एबी डिव्हिलियर्स प्रमाणे मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता असल्यामुळे त्याला एबी बेबी या नावानेही ओळखले जाते. चेन्नई एक्स्प्रेससोबतच्या उर्वरित प्रवासात नव्या गड्याला CSK च्या बोगीतील आपली जागा फिक्स करण्याची एक चांगली संधी असेल. तो दमदार खेळीसह खास छाप सोडत आपल्या जागेवर रुमाल टाकणार का? ते पाहण्याजोगे असेल.
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
पदार्पण एकदम झोकात, पण...
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून डेवाल्ड ब्रेविस याने चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने २५ चेंडूत ४२ धावांची लक्षवेधी खेळीही केली. या खेळीत त्याने एका चौकारासह ४ षटकार मारत आपल्यातील धमक दाखवून दिली. पण त्याची ही खेळीही चेन्नई सुपर किंग्जला पराभव टाळण्यास उपयुक्त ठरली नाही.
डेवॉल्ड ब्रेविसहची IPL मधील कामगिरी
चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळण्याआधी डेवाल्ड ब्रेविस हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून १० सामने खेळल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत ११ सामन्यात त्याच्या खात्यात २७२ धावा जमा आहेत. संघर्ष करणाऱ्या संघातून पदार्पण करताना आपली छाप सोडणे हे एक वेगळेच आव्हान असते. लेट एन्ट्रीनंतर उर्वरित सामन्यात संधीच सोनं करत चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख खेळाडू होण्याची नामी संधी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरसमोर आहे.
Web Title: IPL 2025 CSK vs PBKS 49th Match Lokmat Player To Watch Dewald Brevis Chennai Super Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.