Join us

IPL 2025: संघ हरल्यावर खरडपट्टी काढणारे संजीव गोयंका चक्क पराभवानंतरही हसले, फोटो VIRAL

Sanjiv Goenka Rishabh Pant MS Dhoni, IPL 2025 LSG vs CSK: लखनौच्या पराभवानंतरही गोयंका हसतखेळत गप्पा मारताना दिसले, चाहतेही झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:23 IST

Open in App

Sanjiv Goenka Rishabh Pant MS Dhoni, IPL 2025 LSG vs CSK: लय गमावलेल्या चेन्नईच्या संघाने अखेर सलग पाच पराभवानंतर एक विजय मिळवला. त्यांनी चांगल्या लयीत असलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौचा ५ विकेट्सनी पराभव झाला.या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा हा तिसरा पराभव आहे. सहसा संघ हरल्यानंतर संघमालक संजीव गोयंका अतिशय संतप्त प्रतिक्रिया देताना दिसतात. इतकेच नव्हे तर पहिल्या दोन पराभवानंतर संजीय गोयंका लखनौचा कर्णधार रिषभ पंतची खरडपट्टी काढतानाही दिसले होते. पण या पराभवानंतर गोयंका यांची एक वेगळीच झलक पाहायला मिळाली आणि सारे आश्चर्यचकित केले. या सामन्यानंतरचे काही फोटो व्हायरल झाले, ज्यामुळे संजीव गोयंका यांची चर्चा रंगली आहे.

संजीय गोयंका यांचे वेगळेच रूप

लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका हे त्यांच्या संघाच्या पराभवानंतर अनेकदा थोडे रागावलेले दिसतात आणि कर्णधार-प्रशिक्षकांशी गंभीर संभाषण करताना दिसतात. पण यावेळी ते वेगळ्याच रूपात मैदानावर आले. पराभवानंतरही संजीव गोयंका रिषभ पंतसोबत हसताना आणि विनोदी गप्पा मारताना दिसले. संजीव गोयंका यांच्या या शैलीने सर्वांना आश्चर्यचकित केले. भरमैदानात आपल्याच संघाच्या कर्णधाराशी रागाने बोलण्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. पण CSK विरूद्धच्या पराभवानंतर एक वेगळेच संजीव गोयंका दिसले.

सामन्यानंतर संजीव गोयंका यांनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचीही भेट घेतली. यावेळी लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार पंतही तिथे उपस्थित होता. धोनीदेखील एकेकाळी संजीव गोयंका यांच्या संघाचा भाग होता. गोयंका हे रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचे मालक असतान धोनी संघात होता. त्यावेळी काही मतभेदांमुळे त्यांनी धोनीला कर्णधारपदावरून दूर केले होते. पण काल मात्र ते वेगळ्याच मूडमध्ये दिसले आणि सगळ्यांशी हसतखेळत गप्पा मारताना दिसले.

लखनौचा घरच्या मैदानात पराभव

चेन्नईविरूद्धचा पराभव हा लखनौचा हंगामातील तिसरा पराभव ठरला. सलामीचे दोन सामने गमावल्यानंतर लखनौने सलग सामने जिंकण्याचा सपाटा लावला होता. पण काल विजयाची मालिका खंडीत झाली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने हे लक्ष्य १९.३ षटकांत ५ गडी राखून पूर्ण केले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रिषभ पंतमहेंद्रसिंग धोनीलखनौ सुपर जायंट्सचेन्नई सुपर किंग्सव्हायरल फोटोज्सोशल मीडियासोशल व्हायरल