Join us

IPL 2025 : थाला is Back! MS धोनी 'मॅजिक' अन् CSK साठी Playoffs जंक्शन गाठण्याचं 'लॉजिक'

 फिरुन पुन्हा धोनीवरच आली जबाबदारी; यावेळची परिस्थिती पहिल्यापेक्षा बरी

By सुशांत जाधव | Updated: April 11, 2025 11:30 IST

Open in App

IPL 2025 CSK vs KKR Lokmat Player to Watch MS Dhoni Returns As Chennai Super Kings Captain : "शिट्टी वाजली अन् गाडी सुटली..." यंदाच्या हंगामात चेन्नई एक्सप्रेसनं फायनल जंक्शन गाठण्याच्या इराद्यानं वेगानं धाव घेतली. पण दुसऱ्या स्टेशनावरच  ती ट्रॅकवरून घसरली. 'चेन्नई एक्सप्रेस' ट्रॅकवर येऊन Playoffs जंक्शन तरी गाठणार का? असा प्रश्न चर्चेत असताना थेट इंजिन बदलल्याची बातमी धडकली. आधीच्या इंजिनात बिघाड झाल्याचे सांगत आता टर्बो इंजिनवर पुन्हा भरवसा दाखवण्यात आलाय. इंजिन पॉवरफुल आहे त्यात शंका नाही. पण इंजिन कितीही पॉवरफुल असले तरी एक डबा जरी घसरला तरी अख्खी एक्स्प्रेस पलटी होण्याचा धोका टाळता येत नाही.  त्यामुळे पुन्हा नेतृत्व करत असताना MS धोनीसमोर एक मोठं चॅलेंज असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 फिरुन पुन्हा धोनीवरच आली जबाबदारी; यावेळची परिस्थिती पहिल्यापेक्षा बरी

महेंद्रसिंह धोनी हा क्रिकेट जगतातील यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्येही त्याने आपल्या नेतृत्वाचे कर्त्तृत्व दाखवून दिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पाच वेळा जेतेपद पटकावले. आयपीएलमध्ये नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पुन्हा ही जबाबदारी धोनीच्या खांद्यावर पडण्याची ही काही पहिली वेळ नाही. २०२२ च्या हंगामाच्या आधी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आले होते. जड्डूसह संघाची कामगिरीही ढासळल्यावर या हंगामात पुन्हा धोनी कर्णधार झाल्याचे पाहायला मिळाले. २०२२ मध्ये त्याच्याकडे पुन्हा जबाबदारी आली त्यावेळी खूप उशीर झाला होता. परिणामी हा हंगामत वाया गेल्यावर २०२३ मध्ये धोनीचं मजिक दिसले. यावेळी टास्क अवघड असले तरी पहिल्यापेक्षा परिस्थिती बरी आहे.

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद!

याआधी धोनी पुन्हा कर्णधार झाला त्यावेळी काय घडलं होतं?

२०२२ च्या हंगामात जड्डूच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने ८ पैकी ४ सामने गमावल्यावर महेंद्रसिंह धोनी नेतृत्व करताना दिसला होता. प्लेऑफ्ससाठी पात्र ठरण्यासाठी ६ पैकी ४ सामने जिंकण्याचे चॅलेंज धोनीसमोर होते. जे शक्य झाले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली उर्वरित ६ सामन्यात चेन्नईच्या संघाला फक्त २ विजय मिळवता आले. संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर राहिला. पण त्यानंतर २०२३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने जेतेपद पटकावले. 

धोनी 'मॅजिक'सह CSK साठी कसे असेल यंदाच्या हंगामात शेवटपर्यंत टिकून राहण्याचं 'लॉजिक'?

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ४ सामने गमावले आहेत. ५ पैकी एका विजयासह त्यांच्या खात्यात फक्त २ गुण जमा आहेत. उर्वरित ९ सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला ७ सामने जिंकावे लागतील.  पुन्हा धोनीची कॅप्टन्सीत साथ अन् त्याच्या जर्सीवरील ७ हा लकी आकडा हा CSK ला लॉजिकली प्लेऑफ्सच्या 'मॅजिक फिगर'पर्यंत पोहचवू शकतो, असेच समीकरण दिसते.  

खरंच शक्य आहे का? आकडेवारीतून उत्तर मिळते फिफ्टी-फिफ्टी!  

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जवर यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा सलग चार पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी ज्यावेळी दोन वेळा CSK वर अशी नामुष्की ओढावली त्यात एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपदाचा डाव साधला असून एकदा संघाला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. पहिल्यांदा २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्जवर अशी वेळ आली. पण या परिस्थितीतून जबरदस्त कमबॅक करत संघाने जेतेपदावर नाव कोरले होते. २०२२ मध्ये संघाला यातून सावरता आले नव्हते. दोन्ही वेळी कर्णधारपद हे धोनीकडे होते. यंदाच्या हंगामत चेन्नई सुपर किंग्जचा संघ २०१० ची पुनरावृत्ती करणार का? ते पाहण्याजोगे असेल.   

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाडकोलकाता नाईट रायडर्स