Join us

IPL 2025 : शाहरुख खानच्या संघातील या 'हिरो'नं क्रिकेटसाठी सोडलं होतं घर; आता...

अभिषेक नायरच्या हाताखाली तो घडला अन् आता कोलकातासाठी तो हिरोगिरी करताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:56 IST

Open in App

IPL 2025 CSK vs KKR 25th Match  Player to Watch Angkrish Raghuvanshi Kolkata Knight Riders  : यंदाच्या आयपीएलमध्ये नव्या चेहऱ्यांमध्ये छाप सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील अंगकृष्ण रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) याचाही समावेश होता. २०२१ च्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असलेला आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलून तो प्रकाश झोतात आला होता.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL पदार्पण

गत हंगामातच कोलकाताच्या संघाने त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात पदार्पणाची संधी दिली. RCB विरुद्धच्या लढतीतून आयपीएलमध्ये पदार्पण केल्यावर आता हा युवा खेळाडू कोलकाता संघाचा महत्त्वाचा खेळाडू झालाय. यंदाच्या हंगामात त्याच्यावरही सर्वांच्या नजरा असतील. खेळाचा वारसा असणाऱ्या कुटुंबियात जन्मलेल्या या खेळाडूनं फारच कमी वयात क्रिकेटर होण्याचं स्वप्न घेऊन तो देशातील  क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबईत आला. अभिषेक नायरच्या हाताखाली तो घडला अन् आता कोलकातासाठी तो हिरोगिरी करताना दिसतोय.

CSKचे कर्णधारपद मिळताच MS Dhoni जुन्या सहकाऱ्याला म्हणाला- 'गद्दार'; तो खेळाडू कोण?

आई वडिलांकडून लाभला खेळाचा वारचा, क्रिकेटर होण्यासाठी घर सोडून धरला होता मुंबईचा रस्ता

अंगकृष्ण रघुवंशी याचा जन्म ५ जून,२००५ साली हरयाणातील गुडगाव येथे झाला. आई मलिका बास्केटबॉलमध्ये भारतीय संघाचे प्रतिनधीत्व करणारा चेहरा तर वडील अवनीश हे टेनिस खेळाडू होते. त्याचा भाऊ वडिलांच्या पावलावर पाउल ठेवत टेनिसकडे वळला. दुसरीकडे अंगकृष्ण हा क्रिकेटरचं स्वप्न घेऊन वयाच्या ११ व्या वर्षी घर सोडून मुंबईला आला. त्याचे काका हे मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायचे त्यांच्याच सल्ल्याने तो मुंबईत आला अन् देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचा झाला. आयपीएलमध्ये  तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून छाप सोडतान दिसते. उजव्या हाताने आघाडीच्या फळीत फलंदाजी करणारा अंगकृष्ण रघुवंशी हा डावखुऱ्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो.

आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी

अंगकृष्ण रघुवंशी याला पदार्पणाच्या हंगामात १० सामन्यात संधी मिळाली. यात त्याने एका अर्धशतकासह १६३ धावांचे योगदान दिले होते. गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने जेतेपद पटकावले अन् त्याला IPL चॅम्पियन खेळाडूचा टॅगही लागला.  यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून तो संघाचा भाग आहे. एका अर्धशतकासह त्याने १३३ धावा करत यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट