आयपीएल २०२५ चा ४५ वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पाकिस्तान सुपर लीग सोडून इंडियन प्रीमियर लीगची निवड केलेल्या खेळाडूला संधी दिली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कॉर्बिन बॉशने आज मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये डेब्यू केला आहे.
लखनौविरुद्धच्या सामन्यात कॉर्बिन बॉशला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. कॉर्बिन बॉश दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळतो आणि तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तान सुपर लीगच्या प्लेअर ड्राफ्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कॉर्बिन बॉशचा समावेश करण्यात आला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मी संघासाठी कॉर्बिन बॉशची निवड झाली. पण कॉर्बिन बॉशने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पीएसएलला लाथ मारली. आयपीएलमध्ये कॉर्बिन बॉशची निवड झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर एक वर्षाची बंदी घातली.
कॉर्बिन बॉशचा सहकारी जखमी झाल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्समध्ये स्थान देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू लिझार्ड विल्यम्स एमआयकडून खेळत होता. परंतु त्याला दुखापत झाली. यानंतर मुंबई इंडियन्सने कॉर्बिन बॉशला संधी दिली. कॉर्बिन बॉश अचानक लीगमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीका केली. याबद्दल कॉर्बिन बॉशने माफी मागितली. मी पेशावर झल्मीच्या चाहत्यांची माफी मागतो, असे त्याने म्हटले.
लखनौविरुद्ध मुंबईची प्लेईंग इलेव्हनरायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा.