IPL 2025 After Eden Gardens Scare Jaipur Stadium Receives Bomb Threat : कोलकाता येथील ईडन गार्डन्स नंतर आता गुरुवारी जयपूरच्या सवाई मान सिंह स्टेडियमवर बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आलीये. गुरुवारी ई-मेलच्या माध्यमातून धमकी मिळाल्यावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टेडियम पूर्णत: खाली करून आसपासच्या परिसरात शोध मोहिम राबवण्यात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजस्थान-पंजाब यांच्यातील सामन्याआधी आला धमकीचा ई-मेल
राजस्थान स्पोर्ट्स कौन्सिलचे प्रमुख नीरज के. पवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२५ रोजी होणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याच्या तयारीत असताना गुरुवारी सकाळी सवाई मानसिंह स्टेडियम बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार आहोत. शक्य असल्यास सर्वांना वाचवा," असा उल्लेख संबंधित ई-मेलमध्ये करण्यात आला आहे.
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त
सुरक्षिततेच्या कारणास्तवर स्टेडियम करण्यात आले खाली
या धमकीनंतर स्टेडियमसह सभोवतालचा परिसर मोकळा करण्यात आला. पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक स्टेडियममध्ये पोहोचले आणि परिसरात शोध मोहिम राबवण्यात आली. अतिरिक्त पोलिस आयुक्त कुंवर राष्ट्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियम परिसर आणि सभोवतालच्या इमारतींमध्ये झडती घेण्यात आली. याठिकाणी कोणतीही संशायस्पद गोष्ट आढळलेली नाही. सायबर विभागाकडून संबंधित ईमेल कुणी पाठवला त्याचा शोध घेण्यात येत आहे.
याआधी बंगाल क्रिकेट असोसिएशनलाही आला होता धमकीचा ई-मेल
याआधी बुधवारी ईडन गार्डन्सवर रंगलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामन्याआधी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या अधिकृत अकाउंटवर अशाच प्रकारचा ईमेल आला होता. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर उद्धवस्त केली आहेत. आयपीएल स्पर्धेला लक्ष्य करण्याची धमकी देणारे ई-मेल आले आहेत.