IPL 2025 LSG vs SRH Fight between Digvesh Rathi and Abhishek Sharma : लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यातील दुसऱ्या डावात स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आणि हटके अंदाजातील सेलिब्रेशनमुळे लक्षवेधून घेणारा फिरकीपटू दिग्वेश सिंह राठी हे दोघे भर मैदानात एकमेकांसोबत भिडल्याचे पाहायला मिळाले. लखनौनं सेट केलेल्या २०० प्लस धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मानं दमदार फटकेबाजीचा नजराणा दाखवून देत अर्धशतक झळकावले. तो सामना जिंकून देण्याच्या घाईत दिसत असताना दिग्वेश राठीनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. त्यानंतर दोघांच्यात वादावादी पाहायला मिळाली. नेमकं कधी अन् काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोघांच्यात कधी अन् नेमकं काय घडलं?
सनरायझर्स हैदराबादच्या डावातील आठव्या षटकात दिग्वेश राठी गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात अभिषेक शर्मा शार्दुल ठाकूरच्या हाती झेल देऊन बाद झाला. दिग्वेश राठीनं आपले सिग्नेचर स्टाइल सेलिब्रशन करताना अभिषेक शर्माला डिवचले. हातवारे करत चल नीघ...या तोऱ्यात दिग्वेशनं त्याला खुन्नस दिली. ही गोष्ट अभिषेक शर्माला खटकली अन् तो तंबूत परतण्याचे सोडून दिग्वेशच्या दिशेनं आला. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याचे पाहायला मिळाले. दोघांना रोखण्यासाठी अंपायर्संना आणि संघातील अन्य खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली.
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
दोघांनी आपापल्या संघासाठी केली सर्वोत्तम कामगिरी, पण...
अभिषेक शर्मानं या सामन्यात अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्याने २० चेंडूत ४ चौकार आणि ६ षटाकाराच्या मदतीने २० चेंडूत ५९ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला दिग्वेश राठीनं लखनौकडून ४ षटकात ३७ धावा खर्च करताना अभिषेक शर्मासह इशान किशनच्या रुपात दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. दोघांनी आपापल्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी केली. पण मैदानात जे घडलं त्यामुळे दोघांवरही कारवाई होऊ शकते.