IPL 2025 Gujarat Titans vs Delhi Capitals, 35th Match : आयपीएल २०२५ च्या स्पर्धेतील घरच्या मैदानावर रंगलेल्या ३५ व्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने दमदार फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून दाखवलं आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद २०३ धावा करत गुजरात टायटन्ससमोर २०४ धावांचे टार्गेट सेट केले होते. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात गुजरातच्या संघाने २०० पार धावसंख्येची लढाई कधीच जिंकली नव्हती. त्यात धावांचा पाठलाग करताना शुबमन गिलच्या रुपात संघाला अवघ्या १४ धावांवर धक्का बसला. पण साई सुदर्शन, शेरफेन रुदरफोर्ड आणि जोस बटलर यांच्या दमदार खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघाने दिल्लीने दिलेले टार्गेट परतवून लावत इतिहास रचला. पहिल्यांदाच गुजरातच्या संघाने २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बटलरनं आधी साईसोबत अर्धशतकी भागीदारी, मग रुदरफोर्डच्या साथीनं सेट केला सामना
कर्णधार शुबमन गिल स्वस्तात माघारी परतल्यावर सलामीवीर साई सुदर्शन आणि बटलर जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली. साई सुदर्शन २१ चेंडूत ३६ धावा करून माघारी फिरला. मग बटलरन त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या शेरफेन रुदरफोर्डच्या साथीनं गुजरातच्या संघाला विजयाच्या दिशेने नेले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. रुदरफोर्ड ३४ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४३ धावा करून माघारी फिरल्यावर राहुल तेवतिया आणि जोस बटलर यांनी संघाला विजय मिळवून दिला. जोस बटलरनं ५४ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ९७ धावा करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पहिल्यांदाच गुजरातच्या संघाने आयपीएलमध्ये २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला.
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
२०० पारची लढाई जिंकण्याची धमक दाखवली, तेही दिल्लीसमोर
गुजरात टायटन्सचा संघ २०२२ च्या हंगामापासून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. पदार्पणाच्या हंगामात चॅम्पियन ठरलेल्या या संघाने पहिल्यांदाच २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला आहे. याआधी या संघाने २०२३ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध १९८ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून दाखवला होता. यापुढे जात आता त्यांनी २०० ची लढाई जिंकण्यासाठी सक्षम असल्याची झलक दाखवून दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने या सामन्याआधी ६ सामन्यात फक्त एकच सामना गमावला होता. त्या संघासमोर दिमाखदार विजय नोंदवत गुजरातच्या संघाने आपले तेवर दाखवून दिल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IPL 2025 35th Match GT vs DC Jos Buttler 97 not out helps Gujarat Titans Win By 7 Wickets Against Delhi Capitals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.