IPL 2025 GT vs DC Brilliant Direct Hit From Karun Nair Shubman Gill Run Out : आयपीएल २०२५ स्पर्धेतील गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला यंदाच्या हंगामातील दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात दिल्लीच्या संघानं करुण नायरला सलामीला फलंदाजीला पाठवण्याचा प्रयोग केला. तो बऱ्यापैकी उपयुक्तही ठरला. करुण नायरच्या फलंदाजीतील कामगिरीशिवाय या सामन्यात त्याने फिल्डिंग वेळी दाखवलेली चपळाई चर्चेचा विषय ठरत आहे. ३३ वर्षीय नायरनं डायरेक्ट थ्रो करून गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल याला स्वस्तात माघारी धाडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला गिल
अहमदाबादच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिलेल्या २०४ धावांचा पाठलाग करताना सर्वांच्या नजरा या शुबमन गिलवर होत्या. या मैदानात त्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. पण गुजरातच्या डावातील दुसऱ्याच षटकात तो धावबाद होऊन परतला. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमार गोलंदाजी करत होता. दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर गिलनं चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलावला. या चेंडूवर त्याने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राइक एन्डवरून साईनं क्रिज सोडले. पण तो थांबला. मग कॅप्टनवर माघारी फिरण्याची वेळ आली. पण करूण नायरनं डायरेक्ट स्टंपचा वेध घेतल्यामुळे गिलला तंबूचा रस्ता धरावा लागला.
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
करुण नायरनं चपळाई दाखवत साधला अचूक निशाणा
शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यातील ताळमेळाच्या अभावानंतर निर्माण झालेल्या संधीचं सोन करताना करुण नायरनं क्षेत्ररक्षणातील आपला सर्वोत्त दर्जा दाखवून दिला. तो वेगाने चेंडूवर आला अन् क्षणाचाही विलंब न करता त्याने स्टंपवर अचूक निशाणा साधला. ३ वर्षांनी IPL पदार्पण करताना करुण नायर याने मुंबई इंडियन्स विरुद्ध ८९ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यात मध्यफळीत खेळताना तो रन आउट झाल्याचे पाहायला मिळाले. गुजरात विरुद्ध त्याला सलामीवीराच्या रुपात बढती मिळाली. १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारासह १७२,२२ च्या सरासरीसह ३१ धावा करत संघाला त्याने चांगली सुरुवातही करून दिली. त्यानंतर कमालीच्या क्षेत्ररक्षणासह त्याने मैफिल लुटल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IPL 2025 35th Match GT vs DC Brilliant Direct Hit From Karun Nair Sends GT Skipper Shubman Gill Early Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.