Video: श्रेयस अय्यर-फिल सॉल्ट जोडीचे भरमैदानात तू तू-मैं मैं? गोंंधळ पाहून चाहतेही Shocked

Shreyas Iyer Phil Salt Video: चौदाव्या षटकात घडला होता गोंधळाचा विचित्र प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:02 PM2024-04-15T12:02:04+5:302024-04-15T12:20:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 viral video Shreyas Iyer Phil Salt verbal fight on ground Fans shocked seeing mess in KKR vs LSG match | Video: श्रेयस अय्यर-फिल सॉल्ट जोडीचे भरमैदानात तू तू-मैं मैं? गोंंधळ पाहून चाहतेही Shocked

Video: श्रेयस अय्यर-फिल सॉल्ट जोडीचे भरमैदानात तू तू-मैं मैं? गोंंधळ पाहून चाहतेही Shocked

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shreyas Iyer Phil Salt Controversy, IPL 2024 KKR vs LSG: कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला ८ विकेट्सने धूळ चारली. फिल सॉल्टच्या नाबाद ८९ धावांच्या बळावर KKRने सामना सहज जिंकला. लखनौने २० षटकात १६१ धावांपर्यंत मजल मारत कोलकाताला १६२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने २ विकेट्स ४२ धावांवरच गमावल्या होत्या. पण त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने फिल सॉल्ट दिलेली साथ KKRला विजय मिळवून देण्यास उपयुक्त ठरली. पण याच दोघांमध्ये भरमैदानात तू तू-मैं मैं झाल्याचेही एकदा दिसून आले.

श्रेयस आणि फिल सॉल्ट या दोघांनी संघाच्या विजयासाठी १२० धावांची नाबाद भागीदारी केली. त्यात फिल सॉल्टने मोठा वाटा उचलला. सामन्यात मोहसीन खान १४व्या षटकात गोलंदाजी करत होता. त्यावेळी षटकाच्या चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यरने चेंडू गलीच्या दिशेने मारला. सुरुवातीला तो धावला त्यामुळे फिल सॉल्टदेखील धावला. पण मध्येच श्रेयस मागे फिरला आणि फिल सॉल्टचा गोंधळ उडाला. नशीब बलवत्तर म्हणून फिल सॉल्ट धावबाद झाला नाही. पण घडलेल्या प्रकारावरून श्रेयस अय्यर आणि फिल सॉल्ट या दोघांच्यात थोडासा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच धाव घेतानाचा गोंधळ पाहून चाहतेही काही सेकंदासाठी 'शॉक' झाल्याचे दिसले.

दरम्यान, हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. चाहत्यांनी श्रेयस अय्यरची चांगलीच शाळा घेतल्याचे दिसून आले. तसेच त्याने ३८ चेंडूत केलेल्या नाबाद ३८ धावांच्या खेळीवरूनही त्याला ट्रोल करण्यात आले. गेल्या वर्षीच्या वन डे वर्ल्ड कपमधून तो अद्याप बाहेर आलेला नाही, अशा शब्दांत त्याची काही चाहत्यांनी खिल्ली उडवली.

Web Title: IPL 2024 viral video Shreyas Iyer Phil Salt verbal fight on ground Fans shocked seeing mess in KKR vs LSG match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.