Join us

What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 

भुवनेश्वर कुमारने त्याच्या पहिल्या ५ चेंडूंतच सामन्याचा निकाल निश्चित केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 21:45 IST

Open in App

IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Marathi - भुवनेश्वर कुमारने त्याच्या पहिल्या ५ चेंडूंतच सामन्याचा निकाल निश्चित केला. २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला पहिल्या षटकात दोन मोठे धक्के बसले. सनरायझर्स हैदराबादच्याभुवनेश्वर कुमारने जॉस बटलरची विकेट मिळवली आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर अप्रतिम इनस्विंगरवर संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला. RR चे दोन्ही फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले.  

ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 

SRH ची सुरुवात संथ राहिली आणि त्यांना पॉवर प्लेमध्ये २ बाद ३७ धावा करता आल्या, ज्या यंदाच्या पर्वातील पहिल्या सहा षटकातील त्यांच्या सर्वात कमी धावा ठरल्या. RR चा ट्रेंट बोल्ट व आऱ अश्विन यांनी पॉवर प्लेमध्ये चांगला मारा केल्या आणि त्यामुळे आवेश खान व संदीप शर्मा यांना विकेट मिळाली. अभिषेक शर्मा ( १२) झेलबाद झाला व अनमोलप्रीत सिंग ( ५) अपयशी ठरला. नितीश कुमार रेड्डीने सामन्याचे चित्र बदलले आणि हेडसह ५७ चेंडूंत ९६ धावा जोडल्या. हेडने ४४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. नितीश ४२ चेंडूंत ३ चौकार व ८ षटकांसह ७६ धावांवर नाबाद राहिला. क्लासेनने १९ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या आणि हैदराबादने ३ बाद २०१ धावा उभ्या केल्या. नितीश व क्लासेन यांनी ३३ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. 

भुवनेश्वर कुमारने पुन्हा एकदा पहिल्या षटकात विकेट मिळवताना जॉस बटलरला ( ०) सातव्यांदा माघारी पाठवले. पाचव्या चेंडूवर अप्रतिम इनस्विंग करून भुवीने RR कॅप्टन संजू सॅमसनचे ( ०) तिन्ही त्रिफळे उडवले. आयपीएलच्या पहिल्या षटकात सर्वाधिक २७ विकेट्स घेण्याच्या ट्रेंट बोल्टच्या विक्रमाशी भुवीने बरोबरी केली.  

टॅग्स :आयपीएल २०२४संजू सॅमसनभुवनेश्वर कुमारसनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्स