काव्या मारनच्या संघाला मोठा धक्का; SRH च्या स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार

सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 03:43 PM2024-03-31T15:43:56+5:302024-03-31T15:44:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates - Big blow for Sunrisers Hyderabad, Wanindu Hasaranga ruled out of IPL2024 due to a left heel injury | काव्या मारनच्या संघाला मोठा धक्का; SRH च्या स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार

काव्या मारनच्या संघाला मोठा धक्का; SRH च्या स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Marathi - सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. SRH ने त्यांच्या संघात कोणताच बदल केलेला नाही, तर गुजरात टायटन्सने नूर अहमद व दर्शन नळकांडे यांना संधी देताना स्पेन्सर जॉन्सन व साई किशोर यांना विश्रांती दिली आहे. पण, आजचा सामना सुरू होण्यापूर्वी हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑक्शनमध्ये सनरायझर्सने १.५ कोटींच्या मुळ किमतीत खरेदी केलेल्या अष्टपैलू खेळाडूने आयपीएळ २०२४ मधून माघार घेतली आहे. 


श्रीलंका क्रिकेट (SLC) चे सीईओ ऍशले डी सिल्वा यांनी माहिती दिली की, वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga )  इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या  २०२४ आवृत्तीत भाग घेणार नाही आणि तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेळेत बरे होण्याच्या आशेने पुढील महिना पुनर्वसनासाठी घालवेल. हसरंगा पुढील आठवड्यात SRH शिबिरात सामील होण्याची अपेक्षा होती. पण, टाचेच्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला रिलीज केले होते. त्याने २०२२च्या पर्वात १६ सामन्यांत २६ विकेट्स घेतल्या होत्या.   


“त्याच्या टाचेला सूज आली आहे आणि तो इंजेक्शनने घेत आहे. त्यामुळे त्याने वर्ल्ड कपपूर्वी या समस्येचे निराकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याची त्याच्या निर्णयाची त्याने आम्हाला माहिती दिली,” असे डी सिल्वा पुढे म्हणाले. हसरंगाच्या रुपाने SRHला दुसरा मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी त्यांनी इंग्लंडच्या आदिल रशीदला रिलीज केले. 

Web Title: IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates - Big blow for Sunrisers Hyderabad, Wanindu Hasaranga ruled out of IPL2024 due to a left heel injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.